Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

ध्रुव नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात,  12 पैकी 7 राशीच्या लोकांना होऊ शकतो विशेष लाभ, जाणून घ्या आजचे तुमचे राशिफळ

दिव्य मराठी

Jul 03,2019 12:05:00 AM IST

बुधवार 3 जुलै रोजी आद्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून हे नक्षत्र सकाळी 6 वाजून 37 मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र सुरु होईल. आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३ नोकरीत कंटाळवाणी कामे करावी लागतील. हातचे सोडून पळत्यामागे धावायचा मोह होईल. काही कारणांसाठी मातोश्रींची नाराजी पत्करावी लागेल.वृषभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १ कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. आज आर्थिक बाजूही चांगली असेल. अती स्पष्ट बोलून आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे.मिथुन : शुभ रंग : अबोली | अंक : २ समोरची व्यक्ती जशास तशी भेटणार आहे. रिकाम्या चर्चेून वादविवाद होतील. आज वैवाहिक जिवनात जोडीदाराचे वर्चस्व मान्य करणे हिताचे राहील.कर्क : शुभ रंग : जांभळा | अंक : ४ जमाखर्चाचे बजेट विस्कळीत होईल. आज काही आवाक्या बाहेरचे खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. घरात थोरांशी मतभेद होतील. त्यांच्या वयाचा मान राखाल.सिंह : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६ आज व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला लाभ पदरात पडेल. मनोकामना पूर्ण होतील. दूरावलेले आप्तस्वकिय जवळ येतील.कन्या : शुभ रंग : राखाडी | अंक : ९ ध्येयप्राप्तीसाठी थोडी सकारात्मकता वाढवावी लागेल. कामाचे तासही वाढवावे लगतील. सुसंवादाने प्रश्न सोपे होतील. गृहीणींनी क्षुल्लक गोष्टी विसरुन जाणे हिताचे.तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : ८ ज्यात कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. आज दैनंदीन कामातही अडथळ्यांची शर्यत असेल. गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी | अंक : ७ कुणी आज पाठीवर हात ठेऊन लढ म्हणाले म्हणून लगेच तुम्ही लढायला जावू नका. आज स्वत:च्या मर्यादा ओळखून वागणेच तुमच्या हिताचे असेल.धनू : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३ जोडीदाराच्या खंबीर साथीने कोणत्याही अडचणी सहजच सुटतील. प्रवासास निघाला असाल तर मात्र आज थोडा खोळंबा होण्याची शक्यता आहे.मकर : शुभ रंग : क्रिम | अंक : २ तब्येतीच्या क्षुल्लक तक्रारींकडेही दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्याचप्रमाणे आज कोणतेही निर्णय उतावीळपणे घेऊ नका. मंगलकार्याची बोलणी उद्यावरच ढकला.कुंभ : शुभ रंग : हिरवा | अंक : ७ बऱ्याच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल. कवींना रोमँन्टीक काव्य सुचतील. गृहीणी आज पार्लर्ससाठी आवर्जुन वेळ काढतील.मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : ५ बिल्डर्स, कंत्राटदार व दलाल यांच्यासाठी अनुकूल दिवस. जागेच्या खरेदीसाठी कर्जमंजूरी होईल. आज ज्येष्ठ मंडळींना दम्याचे विकार त्रस्त करतील.
X