Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

आज दिवसभर राहील गुरूपुष्य योग, जाणून घ्या तुमच्या राशीवर कसा राहील आजच्या शुभ योगाचा प्रभाव

दिव्य मराठी

Jul 04,2019 12:15:00 AM IST

गुरुवार 4 जुलै रोजी पुष्य नक्षत्र असल्यामुळे गुरूपुष्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग सूर्योदयापासून उत्तररात्रौपर्यंत राहील. या शुभ योगाच्या प्रभावामुळे प्रत्येक राशीच्या लोकांना कोणत्या न कोणत्या प्रकारचा फायदा अवश्य होईल. फायद्याचे सौदे आणि गुंतवणूक होईल. काही नोकरदार लोकांना बढती मिळू शकते. या योगामध्ये करण्यात आलेल्या शुभ कामामुळे घराची सुख-समृद्धी वाढते आणि आर्थिक कामामध्ये फायदा होतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : लाल | अंक : ७ चर्चेपेक्षा व स्वप्नरंजनापेक्षा तुम्ही कृतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. भावंडास मदत करावी लागेल. वृषभ : शुभ रंग : पिवळा | अंक : ५ व्यवसायात काही नवे हितसंबंध जुळून येतील.प्रवासातही काही फायदेशीर ओळखी होतील.आज जरा आईच्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे.मिथुन : शुभ रंग : जांभळा | अंक : ३ अर्थप्राप्ती बऱ्यापैकी असली तरी अनावश्यक खर्चावर नियंत्रण गरजेचे. व्यासायिकांनी गुंतवणूकीस प्राधान्य द्यावे. गायक कलाकार रसिकांना मंत्रमुग्ध करतील.कर्क : शुभ रंग : निळा | अंक : १ काही अती हुषार मंडळींचा सहवास लाभणार आहे. वाविवादात थोडेसे सामंजस्याचे धोरण ठेवलेले बरे.आज जोडीदाराचे हट्ट पुरवण्यास प्राधान्य द्याल.सिंह : शुभ रंग : सोनेरी | अंक : २ परदेशस्त नातलगांशी संपर्क होईल. अधिकारी वर्गास कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. आज जास्त वेळ घराबाहेच जाईल. घरेलू समस्या दुर्लक्षित होतील.कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ४ चैन व मनोरंजनासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. तुमची अपुरी स्वप्ने साकार होऊ शकतील. मुलांकडून अलेल्या सुवार्तांमुळे आज ज्येष्ठ मंडळी सुखावतील.तूळ : शुभ रंग : क्रिम | अंक : ६ आज अडचणींकडेही सकारात्मकतेने पहाल.ध्येय गाठण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेण्याची तुमची तयारी असेल. अधिकाऱ्यांना सत्तेचा वापर करावा लागेल.वृश्चिक : शुभ रंग : पांढरा | अंक : ९ नोकरीच्या ठीकाणी कितीही राबलात तरी वरीष्ठ खूष होतील या भ्रमात राहू नका. सहकाऱ्यांशी मिळून मिसळून रहा. संध्याकाळी सत्संगाकडे पाय वळतील.धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ८ कोणतेही नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. महत्वाच्या चर्चेत इतरांचे म्हणणे ऐकून घ्या, आपले मत मांडलेच पाहीचे असे नाही.मकर : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७ व्यवसायात बुध्दीचातुर्याने विरांधकांवर मात कराल. घरात एखाद्या मंगल कार्याविषयी बोलणी हाेकारार्थी पार पडतील. आज जमाखर्चाचा तराजू समतोल राहील.कुंभ : शुभ रंग : तांबडा | अंक : २ कुणाकडूनही अपेक्षा न केलेली बरी म्हणजे अपेक्षाभंग होत नाही. हितशत्रू मोकाट सुटले असताना बेसावध राहून चालणार नाही. आज डॉक्टरांची भेट घ्यावीशी वाटेल.मीन : शुभ रंग : मरून | अंक : ४ नोकरी व्यवसायात अनुकूलता राहील. कामगारांना मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल. आज कुटुंबियांचे सहकार्य उत्तम राहील. तरूणांनी व्यसने टाळावीत.
X