आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाजरे - पोर्तुगालच्या नाजरे परिसरातील एका बेस जंपरच्या मृत्यूचा लाइव्ह व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. 50 वर्षांच्या या बेस जंपरने येथील एका उंच टेकडीवरून साथिदारांसह उडी मारली. पण त्यादरम्यान त्याचे पॅराशूटच उघडले नाही. त्यामुळे तो टेकडीवर धडकला आणि त्याच्या शरिराचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. हा व्हिडिओ बेस जंपर्सचा एक सहकारी रेकॉर्ड करत होता. तो त्यादरम्यान ओरडत राहिला.
एका क्षणात मृत्यू...
- ही घटना दोन-तीन दिवसांपूर्वीची असल्याचे समोर येत आहे. व्हिडिओमध्ये दिसतेय की, जेव्हा हा व्यक्ती डोंगराला धडकला त्यानंतर पॅराशूट उघडले. पण तोपर्यंत त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला होता.
- घटनास्थळी हेलिकॉप्टरद्वारे पॅरामेडिक्सची टीम पोहोचली. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
- पोर्तुगालच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की, 50 वर्षांचा हा बेस जंपर जर्मनीचा राहणारा होता. तो याठिकाणी सुट्यांसाठी आला होता.
आधीही घडली आहे ही घटना
पोलिसांनी सांगितले की, हे उंच शिखर येथील प्राइया डो नोर्टेला लागून आहे. येथे नेहमी डेअर डेव्हील्स आणि बेस जंपर उड्या मारतात. यापूर्वी जुलै 2013 मध्ये 29 वर्षांच्या एका व्यक्तीचा मृत्यू अशाच प्रकारे पॅराशूट न उघडल्यामुळे झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.