आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'भक्तांच्या कडेवर पुन्हा बसणार नाही, अश्लील डान्स करणार नाही\' या अटींवर राधे माँला क्लीन चिट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रयागराज (यूपी) - कायम वाद ओढवणाऱ्या मुंबईच्या चर्चित धर्मगुरू राधे माँ ऊर्फ सुखविंदर कौरचे प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्यापूर्वी जुना आखाड्यात घरवापसी झाली आहे. सूत्रांनुसार, भक्तांच्या कडेवर बसून अश्लील डान्स केल्याबद्दल राधे माँने लेखी माफी मागितली आहे आणि भविष्यात असे कृत्य पुन्हा करणार नसल्याचे सांगितले आहे. याच अटीवर जुना आखाड्यात त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे.


जुना आखाड्याने राधे माँचे निलंबन रद्द करून त्यांना प्रवेश तर दिलाच, शिवाय महामंडलेश्वरची पदवीही बहाल केली आहे. आखाड्यात प्रवेश आणि महामंडलेश्वरची पदवी परत मिळाल्याने राधे माँ आता याच महीन्याच्या 25 तारखेला प्रयागराज कुंभ मेळ्यात होणाऱ्या जूना आखाड्याच्या पेशवाईत सहभागी होऊ शकतील, शिवाय कुंभच्या तिन्ही शाही स्नानामध्येही आखाड्याची शोभा वाढवणार आहेत.

 

'राधे माँविरुद्ध गंभीर आरोप नाहीत' - महंत
जुना आखाड्याने कुंभमध्ये महामंडलेश्वर म्हणून राधे माँला जमीन आणि इतर सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. राधे माँचा प्रवेश सर्वात धक्कादायक ठरला आहे, कारण गतवर्षी आखाडा परिषदेने त्यांचे नाव भोंदू बाबांच्या यादीत टाकले होते. राधे माँचे निलंबन रद्द करणे, त्यांना आखाड्यात प्रवेश आणि महामंडलेश्वर पदवी परत बहाल करण्याचे काही दिवसांपूर्वीच जूना आखाड्याच्या बैठकीत ठरले. याची औपचारिक घोषणा रविवारी प्रयागराजमध्ये आखाड्याचे संरक्षक महंत हरिगिरी यांनी केली.

 

महंत म्हणाले की, राधे माँविरुद्धच्या आरोपांची आखाड्याच्या अनेक पथकांनी चौकशी केली होती, परंतु त्यांचे आरोप गंभीर आढळले नाहीत. एवढेच नाही, तर त्यांच्याविरुद्ध कोणतीही क्रिमिनल केस आता पेंडिंग नाहीये. 

 

पायलट बाबाचीही घर वापसी 
राधे माँला प्रयागराजमध्येच 6 वर्षांपूर्वी झालेल्या कुंभ मेळ्याच्या ठीक आधीच निलंबित करण्यात आले होते. राधे माँशिवाय जुना आखाड्याने पायलट बाबाचीही घरवापसी करत त्यांचे निलंबन रद्द केले. आता त्यांना आखाड्याने प्रवेश देत महामंडलेश्वरची पदवी परत केली आहे. राधे माँप्रमाणेच आता पायलट बाबाही कुंभ मेळ्यात जूना आखाडाच्या पेशवाई व शाही स्नानाचा भाग बनतील. त्यांनाही आखाड्याची जमीन व इतर सुविधा मिळतील.

 

पायलट बाबानेही आखाड्याची लेखी स्वरूपात माफी मागितली होती. हरिद्वारात पायलट बाबाच्या मिरवणुकीत गोंधळ माजला होता. तर प्रयागराजच्या कुंभमध्ये त्यांनी महामंडलेश्वरांची परिषद बनवण्यासाठी पुढाकार घेऊन आखाड्याला नाराज केले होते. तथापि, राधे माँ आणि पायलट बाबाच्या मुद्द्यावर आखाडा परिषदेने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...