Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | tuesday 18 june 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 18, 2019, 12:15 AM IST

मंगळवारचे राशिफळ : शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, 12 पैकी 8 राशीच्या लोकांना आज धनलाभ होऊ शकतो

  • tuesday 18 june 2019 daily horoscope in Marathi

    मंगळवार 18 जून 2019 रोजी मूळ नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची कामामध्ये मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

  • tuesday 18 june 2019 daily horoscope in Marathi

    मेष : शुभ रंग : मोतिया | अंक : ५ 
    कामाच्या ठीकाणी काही अडचणींचा सामना करावा लागेल. वरीष्ठांचे समाधान होणे शक्यच नाही.आज नास्तिक मंडळींचेही सत्संगाकडे  पाय  वळतील.  

  • tuesday 18 june 2019 daily horoscope in Marathi

    वृषभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ४
    हितशत्रू सक्रिय असताना कामात चुका  होणार नाहीत याची काळजी घ्या. कुणाकडून कसली अपेक्षाच करू नका म्हणजे अपेक्षाभंगाची  वेळ  येणार नाही.  

  • tuesday 18 june 2019 daily horoscope in Marathi

    मिथुन : शुभ रंग : राखाडी | अंक : ७
    समोरच्या व्यक्तिवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल. आज जोडीदार तुमच्यावर  खुष असेल. 

  • tuesday 18 june 2019 daily horoscope in Marathi

    कर्क : शुभ रंग : भगवा | अंक : ९
    काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला काही डोक्यास ताप देणारी मंडळी भेटू शकतील. मानसिक संतूलन ठेवणे गरजेचे अहे.

  • tuesday 18 june 2019 daily horoscope in Marathi

    सिंह : शुभ रंग : नारिंगी | अंक : २
    नोकदरांना काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. लवकर घर गाठण्याचा प्रयत्न करा कारण जोडीदार आतुरतेने वाट बघत असेल. आनंदी दिवस. 

  • tuesday 18 june 2019 daily horoscope in Marathi

    कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १
    आज मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील.शिक्षणाशी निगडीत व्यवसाय तेजीत चालतील. आज कलाकारांना मात्र स्ट्रगल वाढवावी लागणार आहे.  

  • tuesday 18 june 2019 daily horoscope in Marathi

    तूळ : शुभ रंग : अबोली | अंक : ६
    ऑफिसच्या कामासाठी प्रवास घडतील. प्रवासात होणाऱ्या काही ओळखी भविष्यकाळात फायदेशीर ठरतील. घराबाहेर वाद होण्याची शक्यता अाहे.     

  • tuesday 18 june 2019 daily horoscope in Marathi

    वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८
    आज तुमची आर्थिक कुवत वाढेल. मानसिक स्थिती चांगली असल्याने आज तुमची कार्यक्षमताही चांगली असेल. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. 

  • tuesday 18 june 2019 daily horoscope in Marathi

    धनू : शुभ रंग : केशरी | अंक : ३
    लहरी आणि हट्टी स्वभाव काब्ूत ठेवा. कार्यक्षेत्रात तुमची मते सगळ्यांना पटतीलच असे नाही. एखद्या प्रसंगी सामंजस्याने मार्ग काढावा लागेल. पत्नीचे ऐका.

  • tuesday 18 june 2019 daily horoscope in Marathi

    मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : २
    कंजूषपणा करून काही उपयोग नाही. असा काही खर्च उद्भवणार आहे की जो टाळणे शक्य नाही. घरातील थोरांचे सल्ले विचारात घेणे गरजेचे आहे. 

  • tuesday 18 june 2019 daily horoscope in Marathi

    कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ७    
    व्यापार उद्योगाची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल.काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. संतती बाबत काही आनंददायी घटना घडतील. छान दिवस.   

  • tuesday 18 june 2019 daily horoscope in Marathi

    मीन : शुभ रंग : निळा | अंक : १                                      कामधंद्याच्या ठीकाणी तुमचे महत्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारून त्या पूर्ण कराल. वरीष्ठांच्या कतुकास पात्र व्हाल. यशदायी दिवस. 

Trending