Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

ब्रह्मा नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

दिव्य मराठी वेब

Jun 19,2019 12:20:00 AM IST

बुधवार 19 जून रोजी पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ७ नोकरी धंद्याच्या दृष्टीने थोडा विरोधी दिवस. आज सहकाऱ्यांशी काही मतभेद संभवतात. वरीष्ठांकडून तुमच्या मागण्या धुडकावल्या जातील. संयम ठेवा.वृषभ : शुभ रंग : केशरी | अंक : ९ आज कार्यक्षेत्रात प्रत्येक पाऊल सतर्कतेने टाकायला हवे. आत्मविश्वासाचा अतिरेकही टाळणे गरजेचे आहे. मोठे पैशाचे व्यवहार उद्यावर ढकललेत बरं होईल.मिथुन : शुभ रंग : मोतिया | अंक : ५ कामाची दगदग वाढणार आहे. आज काही आपलेच खरे करणारी माणसे भेटतील. पेचप्रसंग चातुर्याने हाताळावे लागतील. जोडीदाराशी सामंजस्य राहील.कर्क : शुभ रंग : चंदेरी | अंक : ४ आज तुम्ही आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. काही जुने आजार डोेके वर काढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.सिंह : शुभ रंग : अबोली | अंक : ६ जुन्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत. प्रिय व्यक्तीसह प्रवास कराल. एखाद्या करमणूकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल.कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८ कार्यक्षेत्रात प्रगतीपथावर रहाल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रांस यश येईल. प्रेमप्रकरणांपासून लांबच राहीलात तर बरे होईल.तूळ : शुभ रंग : नारिंगी | अंक : २ नोकरीच्या ठीकाणी तणावाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. काही जुन्या चूका निस्तराव्या लागण्याची शक्यता आहे. आज गृहीणींना थकवा जाणवेल.वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १ विविध मार्गाने पैसा येईल. हौसमौज करण्यासाठी सढळ हस्ते खर्च करू शकाल. तुमची जिवनशैली उंचावेल. उद्योगधंद्यातील उद्दीष्टे आज सहज साध्य होणार आहेत.धनू : शुभ रंग : सोनेरी | अंक : २ आज तुम्ही आनंदी व उत्साही मूड मधे असाल. सगळ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधाल. आज काही विरोधकही मैत्रीचा हात पुढे करणार आहेत.मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ३ आज मौजमस्तीस तुमचे प्राधान्य राहील. मुलांचे हट्ट पुरवाल. व्यावसायिकांचे गुंतवणूकीच्या नव्या संधींकडे लक्ष राहील. मुलांच्या आराेग्यास जपा.कुंभ : शुभ रंग : भगवा | अंक : १ आज एखाद्या चांगल्या बातमीने दिवसाची सुरवात होईल. धंद्यातील रखडलेली उधारी वसूल होईल. संततीचे विवाहयोग जुळून येतील. दिवस लाभाचा.मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ७ आज फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. दिवसभराची सर्व कामे आज उत्साहात पार पाडाल. नोकरीच्या ठीकाणी तुमच्या कार्यकौशल्याचे कौतुक होईल.
X
COMMENT