Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | thursday 20 june 2019 daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 20, 2019, 12:20 AM IST

गुरुवारचे राशिफळ : आज संकष्ट चतुर्थी आणि शुभ योगाच्या प्रभावामुळे सात राशीच्या लोकांसाठी दिवस राहील अत्यंत खास, जाणून घ्या इतर 5 राशीच्या लोकांसाठी कसा राहील गुरुवार

 • thursday 20 june 2019 daily horoscope in marathi

  गुरुवार, 20 जून रोजी एक खास शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगामुळे आजचा दिवस सात राशीच्या लोकांसाठी खास ठरू शकतो. ऐंद्र नावाचा योग आणि यासोबतच संकष्ट चतुर्थी असा खास संयोग जुळून येत आहे. या दोन योगांमुळे जवळपास संपूर्ण दिवस शुभ काम केले जाऊ शकतात. बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

 • thursday 20 june 2019 daily horoscope in marathi

  मेष : शुभ रंग : केशरी | अंक : ९ 
  कार्यक्षेत्रात आपले महत्त्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक जिवनांत तुमच्या शब्दाला मान राहील. कामाच्या  व्यापात घरेलू  प्रश्न  दुर्लक्षित  होतील.   

 • thursday 20 june 2019 daily horoscope in marathi

  वृषभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ७
  काही क्षुल्लक कामातही अडचणींचे डोंगर उभे राहतील. नोकरदारांना अधिकारी  वर्ग   खोटी अश्वासने देईल. मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता.   

 • thursday 20 june 2019 daily horoscope in marathi

  मिथुन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ४
  व्यवसयाची गती संथ राहील. सर्वच आर्थिक व्यवहार सावधतेने करणे गरजेचे आहे. विश्वासातल्या माणसाकडूनच विश्वासघात होण्याची शक्यता आहे.  

 • thursday 20 june 2019 daily horoscope in marathi

  कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : ५
  एखाद्या मंगलकार्यात  सहभागी व्हाल. घरात पाहूण्यांची वर्दळ वाढेल. गृहलक्ष्मी प्रसन्न असेल. प्रवासात खोळंबा होऊ शकतो. देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. 

 • thursday 20 june 2019 daily horoscope in marathi

  सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८
  काम कमी व धावपळच जास्त होईल. महत्वाची कामे  रेंगाळतील. भिडस्तपणाने न झेेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकाराल. आज आरोग्याबाबत निष्काळजीपणा नको.  

 • thursday 20 june 2019 daily horoscope in marathi

  कन्या : शुभ रंग : अबोली | अंक : ६
  प्रिय व्यक्तीसोबत एखाद्या रोमँटीक चित्रपटाचा आस्वाद घ्याल. जिवलग मित्रांच्या सहवासात काही जुन्या गमती जमतींना उजाळा द्याल. आनंदी दिवस.

 • thursday 20 june 2019 daily horoscope in marathi

  तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १
  वाहन खरेदीसाठी  कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. प्रॉपर्टी विषयी रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील. प्रेम प्रकरणात नसती आफत होईल.  

 • thursday 20 june 2019 daily horoscope in marathi

  वृश्चिक : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २
  व्यापार उद्योगात कुवती बाहेर आर्थिक उलाढाली नकोत. पारिवारीक जिवनातील काही समस्या सोडवाव्या लागतील. व्यस्त दिवस. आज वाद टाळा. 

 • thursday 20 june 2019 daily horoscope in marathi

  धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ३
  आज धनप्राप्तीचे विविध मार्ग खुले होतील. उच्च रहाणी व उच्च विचारसरणी असेच तुमचे धोरण राहील. गोड बोलून स्वार्थ साधून घेणे तुम्हाला छान जमेल. 

 • thursday 20 june 2019 daily horoscope in marathi

  मकर : शुभ रंग : सोनेरी | अंक : २
  मनोबल उत्तम राहील. आकर्षक पेहरावात घराबाहेर पडाल. एखाद्या समारंभात आत्मविश्वासाने वावराल. महत्वपूर्ण चर्चेत आपले मत परखडपणे मांडाल. 

 • thursday 20 june 2019 daily horoscope in marathi

  कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ७    
  उच्चशिक्षितांना परदेशवारीच्या संधी चालून  येतील. खर्चास थोडा लगाम घालून भविष्य काळाच्या दृष्टीने सुरक्षित गुंतवणूक करण्याचा तुमचा विचार राहील. 

 • thursday 20 june 2019 daily horoscope in marathi

  मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : १                                 पूर्वी केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. नोकरीधंद्यातील अनुकूलता वाढेल.  दुरावलेले नातेसंबंध जवळ येतील. अनपेक्षित लाभ होतील. 

Trending