Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | saturday 22 june 2019 daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

रिलिजन डेस्क, | Update - Jun 22, 2019, 10:13 AM IST

अशुभ योगामध्ये दिवसाची होत आहे सुरुवात, 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी राहावे सावध, येथे जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस

 • saturday 22 june 2019 daily horoscope in marathi

  शनिवार 22 जून 2019 ला धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा ठरू शकतो. या अशुभ प्रभावामुळे लोकांचा मूड खराब होईल आणि चिडचिड वाढू शकते. यासोबतच कामे वेळेवर पुर्ण होणार नाहीत. राशीच्या ग्रह स्थितीनुसार लोक कोणत्या ना कोणत्या अडचणीत असतील. याव्यतिरिक्त अन्य ग्रहांचा मिळता जुळता परिणाम राहिल. सहा राशींसाठी दिवस ठीकठाक राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

 • saturday 22 june 2019 daily horoscope in marathi

  मेष : शुभ रंग : लाल | अंक : ८ 
  कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठया लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. उपवरांंना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. इच्छापूर्तीचा दिवस.

 • saturday 22 june 2019 daily horoscope in marathi

  वृषभ :शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
  व्यवसायात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल. प्रामाणिक प्रयत्नांस यश निश्चित.

 • saturday 22 june 2019 daily horoscope in marathi

  मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ६
  आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्लेवाटप नको. 

 • saturday 22 june 2019 daily horoscope in marathi

  कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ८
  हौसमौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. चूकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल. आज वैवाहीक जिवनांत जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत.  

 • saturday 22 june 2019 daily horoscope in marathi

  सिंह : शुभ रंग : मरून | अंक : ७
  वैवाहीक जिवनांत असलेले किरकोळ मतभेद आज सामंजस्याने मिटू शकणार आहेत. व्यवसायाच्या ठीकाणी भागिदारांशी सलोखा राहील. आनंदी दिवस.

 • saturday 22 june 2019 daily horoscope in marathi

  कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : ९
  नोकरदार मंडळी वरीष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालावे लागणार आहे. ज्येष्ठांना आज डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत.

 • saturday 22 june 2019 daily horoscope in marathi

  तूळ : शुभ रंग : क्रिम | अंक : १
  हौशी मंडळींना आज  जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. तुमच्या कामातील उत्साह इतरांस प्रेरणा देईल. ज्येष्ठांना  प्रकृती स्वास्थ लाभेल. 

 • saturday 22 june 2019 daily horoscope in marathi

  वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ५
  आज मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. गृहीणी वाढत्या जबाबदाऱ्या हसतमुखाने स्विकारतील. 

 • saturday 22 june 2019 daily horoscope in marathi

  धनू :  शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३
  आज घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अती स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावतील. तुमची काही गुपिते उघड होऊ शकतील. 

 • saturday 22 june 2019 daily horoscope in marathi

  मकर : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६
  पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर  तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल. भावंडांमधे मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे.   

 • saturday 22 june 2019 daily horoscope in marathi

  कुंभ : शुभ रंग : निळा | अंक : ४    
  अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान राहतील. योग्य माणसे संपर्कात येतील. महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल.    

 • saturday 22 june 2019 daily horoscope in marathi

  मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : २                                                                             आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवायचा मोह होईल. गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लकही तपासा.  

Trending