Todays Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, 12 पैकी या 8 राशीचे लोक  आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये राहतील लकी

दिव्य मराठी

Jun 23,2019 12:05:00 AM IST

रविवार 23 जून रोजी शततारका नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : केशरी | अंक : १ मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. जिवलग मित्र हिताचे सल्ले देतील. वैवाहीक जिवनात मधुरता राहील. संततीकडून सुवार्ता.वृषभ : शुभ रंग : पिवळा | अंक : ९ नोकरदारांना ओव्हर टईम करावा लागणार आहे.वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ७ नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावर ढकलेली बरी.शासकिय कामे रखडणार आहेत. गृहीणींचा अाज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ६ नवीनच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करताना सावध रहायला हवे. शारिरीक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे.सिंह : शुभ रंग : तांबडा | अंक : ३ ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात घ्या. आज पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत.कन्या : शुभ रंग : निळा | अंक : ५ आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. आहे. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.तूळ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८ घरात अधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील. नवे कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील.वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : ९ आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.धनू : शुभ रंग : चंदेरी | अंक : २ नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदीन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : १ आवक मनाजोगती असल्याने तुमची मन:स्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. जोडीदाराची साथ मोलाची राहील.मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ३ टेलिफोन व लाईट बिले भरावी लागणार आहेत काही देणीही चुकवावी लागणार आहेत. हौसमौज करण्यावर मर्यादा येतील. डोळ्यांची निगा राखा.
X