Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | monday 24 june 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

रिलिजन डेस्क, | Update - Jun 24, 2019, 12:15 AM IST

आठवड्यातील पहिल्या दिवसाची सुरुवात होत आहे शुभ योगात, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील सोमवार

 • monday 24 june 2019 daily horoscope in Marathi

  सोमवार, 24 जून रोजी पूर्वाभाद्रपद नक्षत्र असल्यामुळे आयुष्मान नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा मिळेल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे सोमवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

 • monday 24 june 2019 daily horoscope in Marathi

  मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ७ 
  बरेच दिवसांपासूनची तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होणार आहेत. काही भाग्यवान मंडळींना नव्या वाहनाच्या चाव्या मिळण्याचे योग अहेत

 • monday 24 june 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ : शुभ रंग : निळा | अंक : १
  आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात.अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत.आज मित्रमंडळीं बरोबर मात्र काहीतरी बिनसणार आहे.

 • monday 24 june 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : २
  घरात काहीतरी कारणाने वडीलधाऱ्यांंशी मतभेद होऊ शकतात. आपले म्हणणे त्यांना पटवून सांगायचा व्यर्थ खटाटोप न करता, त्यांच्या वयाचा मान राखा. 

 • monday 24 june 2019 daily horoscope in Marathi

  कर्क :  शुभ रंग : पांढरा | अंक : ३
  आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.

 • monday 24 june 2019 daily horoscope in Marathi

  सिंह : शुभ रंग : मरून | अंक : २
  आज तुम्ही अत्यंत आनंदी, उत्साही व ताजेतवाने असाल. एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल व त्या संधीचे तुम्ही सोने कराल.    

 • monday 24 june 2019 daily horoscope in Marathi

  कन्या : शुभ रंग : भगवा | अंक : ४
  नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. वरीष्ठ गोड बोलून तुमच्याकडून कामे करून घेतील. आज प्रक़ृतीकडे दुर्लक्ष नको. पत्नीची आज्ञा पाळणे हिताचे. 

 • monday 24 june 2019 daily horoscope in Marathi

  तूळ : शुभ रंग : क्रिम | अंक : ५
  कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरणार आहेत. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.  

 • monday 24 june 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६
  आर्थिक बाजू उत्तम असेल. आज घरसजावटीच्या काही  शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल.  मुलांना दिलेले शब्द पाळू शकाल.वाहनाचीही काळजी  घ्यावी लागेल. 

 • monday 24 june 2019 daily horoscope in Marathi

  धनू :  शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३
  काही कौटुंबिक अडचणी तुम्हाला चिंताग्रस्त करतील. परंतु जोडीदाराच्या खंबीर सहकार्याने त्यावर सहज मात करता येईल. काही कारणास्तव प्रवास घडतील. 

 • monday 24 june 2019 daily horoscope in Marathi

  मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८
  पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. आत्मविश्वासाने नव्या योजना राबवता येतील. स्पर्धकांना तुमचा हेवा वाटेल. गरजूंना मदत कराल.

 • monday 24 june 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ : शुभ रंग : अबोली | अंक : ७    
  आज हट्टीपणास लगाम घालून इतरांचे विचार ऐकून घेण्याचीही तयारी ठेवा. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकतील. कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाका. 

 • monday 24 june 2019 daily horoscope in Marathi

  मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९                                                                           आज काही मोठे खर्च दार ठोठावणार आहेत. अध्यात्मिक मार्गाकडे आज तुमचा कल राहील.विदेशाशी संबंधीत कामे यशस्वी होणार आहेत.

Trending