Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Tuesday 25 june 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

रिलिजन डेस्क, | Update - Jun 25, 2019, 12:05 AM IST

सौभाग्य नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, गुंवतणूक आणि आर्थिक व्यवहारमधील अडचणी नष्ट होऊ शकतात

 • Tuesday 25 june 2019 daily horoscope in Marathi

  मंगळवार 25 जून रोजी उ. भाद्रपद नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजच्या ग्रह-स्थितीमुळे सौभाग्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होऊ शकतो. गुंवतणूक आणि आर्थिक व्यवहारमधील अडचणी नष्ट होऊ शकतात. मोठ्या लोकांच्या भेटी होतील. आरोग्य आणि लव्ह लाईफसाठीसुद्धा ग्रह-तारे चांगले राहतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

 • Tuesday 25 june 2019 daily horoscope in Marathi

  मेष : शुभ रंग : आकाशी | अंक : १. 
  व्यवसायातील जीवघेण्या स्पर्धेनेे जरासे नैराश्य येईल. ज्येष्ठ मंडळींनी प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे. देण्याघेण्याचे व्यवहार सावधपणे करावेत.

 • Tuesday 25 june 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ७.
  व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल.काही अपूरे व्यवहार पूर्ण होतील. काही दूरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाह जुळतील.   

 • Tuesday 25 june 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ३
  कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठीकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या अपेक्षा वाढतील. स्वप्नपूर्तीसाठी कामाचे तास वाढवाल.     

 • Tuesday 25 june 2019 daily horoscope in Marathi

  कर्क :  शुभ रंग : हिरवा | अंक : २
  कार्यक्षेत्रात अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळींत मिळून मिसळूून राहणे गरजेचे आहे. मानसिक शांती सत्संगातूनच मिळेल. 

 • Tuesday 25 june 2019 daily horoscope in Marathi

  सिंह : शुभ रंग : भगवा | अंक : ४
  आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करूच नका. हितशत्रू सक्रीय असल्याने प्रत्येक निर्णय विचारांती घ्यावा. आज स्वावलंबनाने यश सोपे होईल. 

 • Tuesday 25 june 2019 daily horoscope in Marathi

  कन्या : शुभ रंग : मरून | अंक : २
  घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव  राहील. एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

 • Tuesday 25 june 2019 daily horoscope in Marathi
 • Tuesday 25 june 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक : शुभ रंग : क्रिम | अंक : ५
  नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी चालून येतील. रूग्ण ठणठणीत बरे होतील. 

 • Tuesday 25 june 2019 daily horoscope in Marathi

  धनू :  शुभ रंग : पिस्ता | अंक : ८
  आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.कलाकारांना निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.

 • Tuesday 25 june 2019 daily horoscope in Marathi

  मकर : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३
  ऑफीस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे, वादविवाद होतील. आज गृहीणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा न ठेवलेली बरी.  

 • Tuesday 25 june 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९    
  आज हट्टीपणास लगाम घालून इतरांचे विचार ऐकून घेण्याचीही तयारी ठेवा. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकतील. कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाका. 

 • Tuesday 25 june 2019 daily horoscope in Marathi

  मीन : शुभ रंग : निळा | अंक : ७                                                                               आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थितीही चांगली राहील. नवविवाहीतांची स्वप्ने साकार होतील. छान दिवस.

Trending