Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | wednesday 26 june 2019 daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

रिलिजन डेस्क, | Update - Jun 26, 2019, 11:05 AM IST

मेष राशीच्या लोकांनी आज आपली कुवत ओळखून आर्थिक धाडस करावे, कुंभ राशीच्या लोकांना पूर्वीच्या कष्टाचे फळ मिळेल

 • wednesday 26 june 2019 daily horoscope in marathi

  बुधवार 26 जून रोजी रेवती नक्षत्र असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा परफॉर्मन्स चांगला राहील. हे लोक आपल्या कामाने वरिष्ठांचे मन जिंकून घेतील. इंटरनेट, जाहिरात, शेअर बाजार, कमोडिटी आणि खेळाशी संबंधित लोकांसाठी दिवस विशेष खास राहील. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

 • wednesday 26 june 2019 daily horoscope in marathi

  मेष : शुभ रंग : पांढरा | अंक : ३ 
  नवीन व्यावसायिकांनी आर्थिक धाडस करताना आपली कुवत अोळखून  करावेे. गुंतवणूक  करतानाही तज्ञांचा सल्ला अवश्यक. कर्ज प्रस्ताव रखडतील. 

 • wednesday 26 june 2019 daily horoscope in marathi

  वृषभ : शुभ रंग : हिरवा | अंक : २.
  योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन याच्या जोरावर यशाकडेच तुमची वाटचाल चालूच राहील. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. अकस्मिक धनलाभाची शक्यता. 

 • wednesday 26 june 2019 daily horoscope in marathi

  मिथुन : शुभ रंग : आकाशी | अंक : १.
  आज तुम्ही मित्रमंडळींच्या फार नादी लागू नका. आत्मविश्वास व स्वावलंबन गरजेचे आहे. आज ऐकावे जनाचे व करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील.  

 • wednesday 26 june 2019 daily horoscope in marathi

  कर्क : शुभ रंग : राखाडी | अंक : ७.
  नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांनी दिलेल्या शाब्बासकीस बळी जाऊ नका. हाताखालच्या लोकांशीही सलोख्याचे संबंध गरजेचे आहेत. उपासनेत खंड पडू देऊ नका. 

 • wednesday 26 june 2019 daily horoscope in marathi

  सिंह : शुभ रंग : मरून | अंक : २                                                                                 आज आपल्याच प्रेमात रहा. कुणालाही सल्ले द्यायच्या भानगडीत पडू नका. मनस्ताप देणाऱ्या घटना घडतील. कोणतीच रिस्क नको.  

 • wednesday 26 june 2019 daily horoscope in marathi

  कन्या : शुभ रंग : भगवा | अंक : ४
  काेणत्याही क्षेत्रात असलात तरी स्पर्धा अटळ आहे. खेळाडूंना आज अटीतटीची झुंज द्यावी लागणार आहे. वैवाहीक जिवनात आज आय लव्ह यू म्हणून टाका. 

 • wednesday 26 june 2019 daily horoscope in marathi

  तूळ : शुभ रंग : क्रिम | अंक : ५.
  बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. कामगारांच्या रास्त मागण्या मान्य होतील. ज्येष्ठ मंडळींनी फक्त आपल्या तब्येतीस जपावे, जास्त दगदग टाळावी.  

 • wednesday 26 june 2019 daily horoscope in marathi

  वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६.
  विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल. आपला बडेजाव दाखवण्यासाठी खर्च कराल.आज सहकुटुंब मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल.

 • wednesday 26 june 2019 daily horoscope in marathi

  धनू :  शुभ रंग : निळा | अंक : ७.
  आज अावक जावक सेम सेम राहील. भावंडात प्रेम राहील. गृहीणी स्वत:च्या आवडीस प्राधान्य देतील.मुले पालकांच्या आज्ञेत राहतील. आशादायी दिवस.

 • wednesday 26 june 2019 daily horoscope in marathi

  मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९.
  दैनंदीन कामांचा कंटाळा येईल. इतरांना न जमणारे काहीतरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील. विद्यार्थ्यांना नवीन विषयात गाेडी निर्माण होईल. 

 • wednesday 26 june 2019 daily horoscope in marathi

  कुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३.    
  व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल. कार्यक्षेत्रात योग्य हितसंबंध निर्माण होतील. पुरेशी बचत करता येईल.  

 • wednesday 26 june 2019 daily horoscope in marathi

  मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८                                                                                  आज काही मनाजोगत्या घटना घडल्याने तुमचा कार्यउत्साह वाढेल. महत्वाच्या चर्चेत अग्रेसर  रहाल. कुणी केलेल्या खोटया स्तुतीनेही भाराऊन जाल. 

Trending