Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | thursday 27 june 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

रिलिजन डेस्क, | Update - Jun 27, 2019, 12:05 AM IST

अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, 12 पैकी सहा राशीच्या लोकांनी आज राहावे सावध

 • thursday 27 june 2019 daily horoscope in Marathi

  जून महिन्यातील शेवटचा गुरुवार 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी ठीक नाही. रेवती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती अतिगंड नावाचा अशुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे सहा राशीच्या लोकांची कामे बिघडू शकतात. हा अशुभ योग टेन्शन, खर्च आणि नुकसान वाढवतो. याचा अशुभ प्रभाव आरोग्यावरही पडू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

 • thursday 27 june 2019 daily horoscope in Marathi

  मेष : शुभ रंग : पिस्ता | अंक : १
  कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील.

 • thursday 27 june 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ : शुभ रंग : अबोली | अंक : ३
  आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल. 

 • thursday 27 june 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९
  दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेते मंडळींची लोकप्रियता वाढेल. 

 • thursday 27 june 2019 daily horoscope in Marathi

  कर्क :  शुभ रंग : पांढरा | अंक : ५
  पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेेत. दूरावलेल्या नात्यांतील गैरसमज दूर होतील.

 • thursday 27 june 2019 daily horoscope in Marathi

  सिंह : शुभ रंग : क्रिम | अंक : ४ 
  आज स्वत:चे लाड पुरवण्यासाठी  खर्च कराल.अधुनिक राहणीमानाकडे कल राहील. रागाऊन निघून गेलेल्या व्यक्ती दुपारनंतर घरी परत  येतील. 

 • thursday 27 june 2019 daily horoscope in Marathi

  कन्या : शुभ रंग : निळा | अंक : ६
  सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा.आज स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमधे वितुष्ट संभवते.

 • thursday 27 june 2019 daily horoscope in Marathi

  तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : ३
  नोकरीच्या ठीकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरीष्ठांना प्रभावित करेल. 

 • thursday 27 june 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
  रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. सरकार दरबारी रखडलेली काही कामे दुपारनंतर मार्गी लागतील. 

 • thursday 27 june 2019 daily horoscope in Marathi

  धनू :  शुभ रंग : सोनेरी | अंक : २
  नोकरीत वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. वैवाहीक जिवनांत जोडीदाराची मते विचारात घेणे गरजेचे आहे.  

 • thursday 27 june 2019 daily horoscope in Marathi

  मकर : शुभ रंग : केशरी | अंक : १
  व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील.वैवाहीक जिवनांत संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. 

 • thursday 27 june 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी  | अंक : ९
  नोकरीच्या ठीकाणी अधिकारी वर्गाची आपल्यावर मर्जी आहेच या भ्रमात राहू नका. सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. जोडीदाराशी दुपारनंतर एकमत राहील.

 • thursday 27 june 2019 daily horoscope in Marathi

  मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : ७
  आर्थिक स्थिती उत्तम असल्याने मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. सहकुटुंब चैन व मनोरंजनास प्राधान्य द्याल. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांच्या भेटीची ओढ लागेल.

Trending