Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

शनिवारचे राशिफळ : शुभ योगामध्ये होत आहे आठवड्यातील शेवटच्या दिवसाची सुरुवात, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

दिव्य मराठी

Jun 29,2019 12:05:00 AM IST

शनिवार 29 जून 2019 रोजी भरणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग सात राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : पांढरा | अंक : ५ आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील. प्रवास कंटाळवाणे होणार आहेत. मौल्यवान ऐवज सांभाळा.वृषभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९ महत्वाचे व्यावसायिक करार दुपारनंतर करावे. काही हरवले असल्यास गवसेल. आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास आज करून चालणार नाही.मिथुन : शुभ रंग : निळा | अंक : ६ तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीस धाऊन जाणार आहात.कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ४ नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. विरोधकांचा जोर आता कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : १ दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल.कन्या : शुभ रंग : अबोली | अंक : ३ आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.तूळ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८ तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. दुपारनंतर मात्र थोडीफार अस्वस्थता जाणवेल. आर्थिक व्यवहार दुपारपूर्वी उरका.वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९ शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.धनू : शुभ रंग : मोतिया | अंक : ३ उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. पत्नीच्याही लहरी सांभाळाल.मकर : शुभ रंग : सोनेरी | अंक : २ कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमाचा कार्यउत्साह वाढवतील. आज मुले अज्ञाधारकपणे वागतील. एकतर्फी प्रेमाला समोरुन होकार मिळेल.कुंभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ७ कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. आज घरचे सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजाल.मीन : शुभ रंग : भगवा | अंक : १ आज महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी.थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्वाची मेल्स येणार आहेत. दुपरानंतर प्रवासास निघाल.
X