• Home
  • Junior Bruce Lee From Japan The New Internet Sensation

Bruce Lee चा / Bruce Lee चा पुनर्जन्म! इंटरनेट सेन्सेशन बनलाय हा 8 वर्षांचा चिमुकला, रोज 4.5 तास व्यायाम करून बनवले 6 पॅक

दिव्य मराठी वेब टीम

Nov 09,2018 12:19:00 PM IST

स्पेशल डेस्क - जपानच्या नारा शहरात राहणारा हा चिमुकला ब्रूस लीचा कुठलाही स्टंट अगदी हुबेहूब करू शकतो. ऱ्यूसी इमाई उर्फ ऱ्यूजी असे त्याचे नाव असून तो फक्त 8 वर्षांचा आहे. वयाच्या सहाव्या वर्षीच त्याने आपले सिक्स पॅक अॅब्स बनवले. जपानच नव्हे, तर जगभरात त्याचे यूट्युब व्हिडिओ पाहिले जातात. त्याला 'छोटा ब्रूस ली' असेही म्हटले जाते. तर काही लोक त्याला पाहून ब्रूस ली पुन्हा जन्माला आला असे म्हणतात.


- नुकताच आपला 8 वा वाढदिवस साजरा करणारा ऱ्यूजी याला अगदी बाळ असतानाच ब्रूस लीच्या चित्रपटांचे वेड लागले होते. काही कळत नव्हते, तेव्हा सुद्धा तो ब्रूसलीला पाहून उड्या मारायचा.
- आपल्या पायांवर उभा झाला आणि चालायला शिकतच होता तेव्हा तो टीव्हीत पाहून ब्रूस लीचे स्टंट कॉपी करायला लागला. 4 वर्षांचा झाला तेव्हापासूनच त्याने कठोर व्यायाम सुरू केला. डेली मेलच्या वृत्तानुसार, तो वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी दररोज 4.5 तास व्यायाम करतो.
- इतक्या लहान वयात त्याने पिळदार शरीरयष्टी बनवली. त्याच्या शरीरातला प्रत्येक मसल आणि सिक्स पॅक अॅब सुद्धा बनवले. आपल्या अनेक व्यायामांचे व्हिडिओ आणि फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत राहतो. त्याच्या पालकांनी सांगितल्याप्रमाणे, केवळ टीव्हीवर पाहून त्याने हे सर्व काही शिकले आहे.

X
COMMENT