Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Jupiter transit rashifal 2019 in Marathi

राशिफळ : 13 जुलैपर्यंत गुरु राहील वक्री, सर्व 12 राशींवर असा राहील गुरूचा प्रभाव

रिलिजन डेस्क | Update - Apr 10, 2019, 12:01 AM IST

11 एप्रिलला धनु राशीमध्ये वक्री होत आहे गुरु, मेष राशीच्या लोकांचा अडकलेला पैसे मिळेल परत, कन्या राशीच्या लोकांना होऊ शक

 • Jupiter transit rashifal 2019 in Marathi

  गुरु ग्रहाने मागील महिन्यात 30 मार्चला वृश्चिक राशीमधून धनु राशीमध्ये प्रवेश केला होता. धनु राशीचा स्वामी गुरूच आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार धनु राशीमध्ये गुरु 11 एप्रिलला वक्री होत आहे. त्यानंतर 22 एप्रिलला पुन्हा वृश्चिक राशीमध्ये येईल. वक्री म्हणजे उलटे चालणे आणि मार्गी म्हणजे सरळ चालणे. हा ग्रह आता 13 जुलैपर्यंत वृश्चिक राशीमध्ये वक्री राहील. त्यानंतर याच राशीमध्ये मार्गी होईल. 13 ऑक्टोबरला पुन्हा धनु राशीमध्ये प्रवेश करेल. येथे जाणून घ्या, सर्व 12 राशींवर कसा राहील गुरूचा प्रभाव....


  मेष
  गुरुची पाचवी दृष्टीही राहील. या राशीसाठी नववा गुरु आरोग्यात सुधार करणारा राहील. अडकलेले धन परत मिळेल. धार्मिक कार्याचे आयोजन आणि खर्च होण्याची शक्यता.


  वृषभ
  आठवड्या गुरूमुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. बांधकाम क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. गुंतवणुकीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींवर कसा राहील गुरूचा प्रभाव...

 • Jupiter transit rashifal 2019 in Marathi

  मिथुन
  सातवा गुरु तुम्हाला नोकरी आणि व्यापारात प्रतिष्ठा तसेच धनलाभ करून देणारा राहील. जुने वाद संपुष्टात येतील. आर्थिक लाभाचे योग आहेत.


  कर्क 
  सहावा गुरु असल्यामुळे तुमचा स्वभाव थोडासा रागीट होऊ शकतो. क्रोधावर नियंत्रण मिळवल्यास संकटांपासून दूर राहू शकता. स्वभाव थोडासा मनमिळावू ठेवा.

 • Jupiter transit rashifal 2019 in Marathi

  सिंह
  पाचवा गुरु नवीन उत्साह प्रदान करेल. प्लॅनिंगनुसार काम झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. गुरुची नववी दृष्टीही प्राप्त होईल, ज्यामुळे फायद्याची स्थिती निर्माण होऊ शकते.


  कन्या 
  चौथ्या गुरूमुळे धनहानी होण्याचे योग जुळून येत आहेत. सावध राहावे, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका आणि अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नये.

 • Jupiter transit rashifal 2019 in Marathi

  तूळ
  तिसरा गुरु तुमच्यासाठी लाभदायक राहील. सुरुवातील अपयशानंतर यश प्राप्त होईल. हा काळ चांगला राहील. नवीन व्यापार सुरु होईल.


  वृश्चिक 
  तुमच्यासाठी दुसरा गुरु अनुकूल राहील. पूर्वीपेक्षा परिस्थिती चांगली राहील. धनलाभ होईल आणि अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येतील, लग्न जुळण्यात येत असलेल्या बाधा दूर होतील.

 • Jupiter transit rashifal 2019 in Marathi

  धनु
  गुरु सध्या याच राशीमध्ये राहील. तुमच्यासाठी हळू-हळू लाभाची स्थिती निर्माण होईल. शत्रूवर नियंत्रण ठेवाल. शासकीय कामामध्ये यश प्राप्त होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.


  मकर
  बारावा गुरु या राशीसाठी ठीक नाही. ज्या लोकांचा जन्म दुपारी झाला असेल त्यांच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. धनलाभ होऊ शकतो. इतर लोकांनी सावध राहून काम करावे.

 • Jupiter transit rashifal 2019 in Marathi

  कुंभ 
  अकरावा गुरु अत्यंत लाभदायक राहील. घवघवीत यश प्राप्त होईल. मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या समस्या दूर होतील. धनलाभ तसेच मान-सन्मानात वाढ होईल.


  मीन
  दहावा गुरु या राशीचा स्वामी आहे. गुरूमुळे व्यापारात लाभ आणि उन्नती होईल. कुटुंबियांकडून आनंद मिळेल. वाहन प्राप्ती होईल. कर्ज प्रकरण दूर होण्यास मदत होईल.

Trending