आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Just After 8 Months Of Heart Transplant, Ran In The Marathon, Completed Full Five Km Race In 56 Minutes

8 महिन्यांपूर्वी झाले होते हार्ट ट्रांसप्लँट ऑपरेशन, आता 56 मिनीटात पूर्ण केली 5 किलोमीटर मॅरेथॉन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद(गुजरात)- येथील 39 वर्षीय प्रियांक दीक्षित हार्ट ट्रांसप्लँटच्या 8 महिन्यानंतर मॅराथॉनमध्ये धावले आणि अवघ्या 56 मिनीटत त्यांनी 5 किलोमीटरची मॅराथॉन रेस पूर्ण केली. पण डॉक्टरांनी एक वर्षांपर्यंत कोणतीही मोठी अॅक्टिव्हिटी करण्यास मज्जाव केला होता.

 

प्रियांक ने सांगितले की- "एक काळ होता, जेव्हा माझे ह्रदय फक्त 20 % काम करायचे. चार पाऊलेही मला चालता येत नव्हती. तेव्हा माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचार यायचा, पण या मॅराथॉनला पूर्ण केल्यानंतर माझ्यात खूप आत्मविश्वास आला आहे" एका खासगी बँकेत झोनल एचआर हेड पदावर असलेले प्रियांक अहमदाबादच्या चांदखेडामध्ये राहतात.

 

20 टक्के ह्रदय काम करत होते, तेव्हा केली सर्जरी
प्रियांकने सांगितले की, "2010 मध्ये पहिल्यांदा त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना कळाले की, त्यांना साइलंट हॉर्ट-अटॅक आला होता. प्रकृती खराब झाल्यावर 2012 मध्ये गु़डगांवच्या एका खासगी रुग्णालयात सीआरटीडी डिव्हाइस इंप्लांट केले. त्यानंतर ह्रदय 18 ते 20% च काम करत होते. नंतर मे 2018 मध्ये हार्ड ट्रासंप्लँट केले.