आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई | राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची (२०१८) घोषणा बुधवारी करण्यात आली. पुरस्कार मिळवणाऱ्या मान्यवरांत औरंगाबादचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, सोलापूरचे साहित्यिक द. ता. भोसले, नागपूरच्या कवयित्री प्रभा गणोरकर, कोल्हापूरच्या अनुवादक मेधा पानसरे आणि औरंगाबादचे नाटककार अजित दळवी, विलास सिंदगीकर आदींचा समावेश आहे. या पुरस्कारात विविध वाङ्मय प्रकारातील ३५ साहित्यकृतींचा समावेश आहे. पुरस्काराची रक्कम १ लाख ते ५० हजार आहे. पुरस्कार विजेत्यांची यादी १. प्रौढ वाङ्मय - काव्य, कवी केशवसूत पुरस्कार, 1,00,000/-, रवीन्द्र दामोदर लाखे, अवस्थांतराच्या कविता, कॉपर कॉइन पब्लिशिंग प्रा. लि., गाजियाबाद, दिल्ली. २. प्रथम प्रकाशन - काव्य, बहिणाबाई चौधरी पुरस्कार, 50,000/-, राही डहाके, हजार रक्तवर्णी सूर्य, कॉपर कॉइन पब्लिशिंग प्रा. लि., गाजियाबाद, दिल्ली. ३. प्रौढ वाङ्मय नाटक/एकांकिका, राम गणेश गडकरी पुरस्कार, 1,00,000/-, अजित दळवी, समाजस्वास्थ्य, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई. ४. प्रथम प्रकाशन - नाटक/एकांकिका, विजय तेंडूलकर पुरस्कार, 50,000/-, प्राजक्त देशमुख, देवबाभळी, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई. ५. प्रौढ वाङ्मय - कादंबरी, हरी नारायण आपटे पुरस्कार, 1,00,000/-, किरण गुरव, जुगाड, दर्या प्रकाशन, पुणे. ६. प्रथम प्रकाशन - कादंबरी, श्री. ना. पेंडसे पुरस्कार, 50,000/-, संग्राम गायकवाड, आटपाट देशातल्या गोष्टी, मनोविकास प्रकाशन, पुणे. ७. प्रौढ वाङ्मय - लघुकथा, दिवाकर कृष्ण पुरस्कार, 1,00,000/-, विलास सिंदगीकर, बाजार, इसाप प्रकाशन, नांदेड. ८. प्रथम प्रकाशन - लघुकथा, ग.ल.ठोकळ पुरस्कार, 50,000/-, दिनकर कुटे, कायधूळ, हर्मिस प्रकाशन, पुणे. ९. प्रौढ वाङ्मय - ललितगद्य (ललित विज्ञानासह), अनंत काणेकर पुरस्कार, 1,00,000/-, विनया जंगले, मुक्या वेदना-बोलक्या संवेदना, मौज प्रकाशन गृह, मुंबई. १०. प्रथम प्रकाशन - ललितगद्य, ताराबाई शिंदे पुरस्कार, 50,000/-, नीलिमा क्षत्रिय, दिवस आलापल्लीचे, ग्रंथाली, मुंबई. ११. प्रौढ वाङ्मय - विनोद, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार, 1,00,000/, ज्युनियर ब्रह्मे (रुपेश कुडुचकर), ब्रह्मेघोटाळा, वॉटरमार्क पब्लिकेशन, पुणे. १२. प्रौढ वाङ्मय - चरित्र, न.चिं.केळकर पुरस्कार, 1,00,000/-, सुनिता तांबे, सागर रेड्डी, नाम तो सुना होगा, अक्षयभारती प्रकाशन, मुंबई. १३. प्रौढ वाङ्मय -आत्मचरित्र, लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, 1,00,000/-, गो. तु. पाटील, ओल अंतरीची..., जयप्रकाश रामचंद्र लब्दे. १४. प्रौढ वाङ्मय - समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन, श्री. के. क्षीरसागर पुरस्कार, 1,00,000/-, डॉ. पराग घोंगे, अभिनय चिंतन, भरतमुनी ते बर्टोल्ट ब्रेख्त, विजय प्रकाशन, नागपूर.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.