आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४ कैद्यांना फासावर दिल्यानंतरच न्याय झाला असे म्हणेन :निर्भयाची आई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पवन कुमार

नवी दिल्ली - १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फासावर देण्याची तयारी तुरुंग प्रशासनाने केली आहे. परंतु घटनेस ७ वर्षे उलटून गेल्यानंतरही निर्भयाची आई याला न्याय मानत नाही. चारही दोषींना फासावर लटकविल्यानंतरच न्याय दिला, असे म्हणेन, असे त्यांचे मत आहे. यांच्याशी झालेल्या मुलाखतीचे अंश : 
 

> दोषींना फाशी देण्याची तयारी सुरू झाली आहे. काय सांगाल?
गेल्या ७ वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष सुरू आहे. आधी कनिष्ठ न्यायालय, नंतर उच्च न्यायालय आता सर्वोच्च न्यायालय. आता राष्ट्रपती शिक्कामोर्तब करतील. ज्या दिवशी त्यांना फाशी होईल. त्या दिवशी न्याय मिळाला असे म्हणेन. परंतु ७ दिवस उलटूनही गुन्हेगार जिवंत आहेत. 

> मुलीच्या मित्राकडून पैसे घेऊन मुलाखत देण्यावर काय सांगाल?
लोक सांगतात, ती बाब ७ वर्षांपूर्वीही त्यांना माहिती होती. ७ वर्षांनंतर इमान जागवण्याच्या काय फायदा. यावर मला काही बोलायचे नाही. 

> घटनेनंतर तुमच्यात व कुटुंबियात काय बदल झाले? 
मुलीच्या नावे विश्वस्त संस्था काढली आहे. बलात्कारपीडितांना आम्ही मदत करतो. या माध्यमातून आम्ही अनेक पीडितांची तपासणी व इतर साह्य मिळवून देण्यात यशस्वी ठरलो. 
 

दु:खावेगाने मुलगी म्हणाली, त्यांना जिवंत जाळा
आशा देवी भावूक स्वरात म्हणाल्या, घटनेच्या तिसऱ्या दिवशी रुग्णालयात उपचारादरम्यान दंडाधिकाऱ्यासमक्ष ती दु:खावेगाने म्हणाली, त्यांना जिवंत सोडून नका, जाळून टाका. अशी कठोर शिक्षा करा की, पुन्हा कोणी असे कृत्य करण्यास धजावणार नाही. मी मुलीच्या उशाशी उभी होते. आजही तिचे बोल आठवून मला खूप वेदना होतात. तर न्यायाची लढाई लढण्याचे बळही देतात.