आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Justin Bieber And Hailey Baldwin Got Married For The Second Time, With Only 157 Guests In Attendance

जस्टिन बीबर आणि हेली बाल्डविन यांनी दुसऱ्यांदा केले लग्न, केवळ 157 पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले फंक्शन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : सिंगर जस्टिन बीबरने मॉडल हेली बाल्डविन सोबत सोमवारी 30 सप्टेंबरला दुसऱ्यांदा लग्न केले. बीबरने लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये पत्नी बाल्डविनसाठी लिहिले, 'माय ब्राइड इज फायर. या फोटोजला 'द बीबर्स' हे टायटल दिले गेले. दोघांनी न्यूयॉर्क कोर्ट हाउसमध्ये 2018 मध्ये गोपनीय पद्धतीने लग्न केले. 

My bride is 🔥

A post shared by Justin Bieber (@justinbieber) on

रिपोर्ट्सनुसार, सोमवारी लग्नापूर्वी बीबर प्रायव्हेट प्लेनने साउथ कॅरोलिनाला आला. येथे त्याने रविवारी रात्री मोरलँड लॅण्डिंगमध्ये 36 मित्रांसाठी प्रायव्हेट पार्टीदेखील दिली. यादरम्यान हॉलिवूड मुव्ही 'नोटबुक' चे स्पेशल स्क्रीनिंगदेखील ठेवले गेले होते. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये बीबर आणि बाल्डविनच्या लहानपणीचे फोटोही आहेत. यामध्ये बीबरने लिहिले - 'मी माझी पत्नी आणि सासरची मंडळी. माझ्यासारख्या जंगलीसोबत आपल्या मुलीचे लग्न करून दिल्याबद्दल धन्यवाद..'