आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Jwala Gutta Joins The #MeToo, Says She Was Harassed In 2006 And After Rio Olympics

#MeeToo: आता ज्वाला गुट्टाने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, 2006 मध्ये त्याने माझे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - लैंगिक अत्याचार विरोधात आवाज उठवण्यासाठी सुरू झालेल्या #MeeToo मोहिमेने जगभरातील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यात महिला प्रामुख्याने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या किंवा भूतकाळात झालेल्या आपल्या मानसिक आणि शारीरिक छळांचा खुलासा करत आहेत. या मोहिमेची भारतात सध्या तनुश्री दत्तामुळे चर्चा असतानाच आता प्रसिद्ध माजी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु, ट्विटरवर त्या घडामोडी शेअर करताना तिने कुणाचेही नाव घेणे टाळले आहे. 

 

Maybe I should talk about the mental harassment I had to go through... #metoo

— Gutta Jwala (@Guttajwala) 9 October 2018

35 वर्षीय माजी बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टाने ट्विटरवर लिहिले, की तिचा मानसिक छळ करण्यात आला होता. त्यावेळी टॉपची परफॉर्मर असतानाही तिचे नाव नॅशनल टीममधून बाहेर फेकण्यात आले होते. परंतु, ती व्यक्ती नेमकी कोण होती, जिने आपला मानसिक छळ केला याचा खुलासा ज्वालाने केला नाही. मला वाटते, माझ्या मानसिक छळावर बोलताना मलाही #metoo कॅम्पेनच्या माध्यमातून जावे लागेल. 

 

 

Since 2006.since this person became the chief ..threw me out of national team inspite of me being a national champion.the latest was when I returned from https://t.co/Ag37TlXFd3 out of national team https://t.co/OVhyvFNAN9 of the reasons I stopped playing!!

— Gutta Jwala (@Guttajwala) 9 October 2018

नेमके काय लिहिले?
"2006 मध्ये ही व्यक्ती चीफ बनली होती. त्यानेच मला नॅशनल टीममधून बाहेर फेकले होते. मी त्यावेळी नॅशनल चॅम्पियन होते. यानंतर मी जेव्हा रिओ ऑलिम्पिकमधून परतले होते. तेव्हा देखील माझे नाव नॅशनल टीममधून वगळण्यात आले होते. हेही एक प्रमुख कारण आहे, की मी खेळ सोडला. जेणेकरून ती व्यक्ती माझ्या संपर्कात राहणार नाही." यानंतर तिने लिहिले, की "त्याने माझ्या पार्टनर्सला सुद्धा धमकावणे आणि त्यांचे छळ करणे सुरू केले. मी कशी एकाकी पडेल यासाठीच त्याने पुरेपूर प्रयत्न केला. मी सिंगल खेळू शकले नाही. परंतु, ज्यावेळी डबल्ससाठी पार्टनर निवडला त्याने त्याला देखील धमकावले. यानंतर मला टीममधून बाहेर काढण्यात आले."

 

बातम्या आणखी आहेत...