आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळा ज‌वळ आलाय, पक्षी जगले पाहिजेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योती अहिर

उन्हाळ्यात पक्षी बाहेर येतात व निवाऱ्याचा पर्याय न मिळाल्याने उन्हाला बळी पडतात. त्यामुळे उन्हाळ्यात पक्षी जगवण्यासाठी प्रत्येकाने जमेल ते करावे आणि पक्ष्यांना जगवावे्
यंदा एप्रिल महिन्यातच शहरात व ग्रामीण भागात साधारणतः दैनंदिन तापमान हे  अधिक असल्याची नोंद आहे. या वाढत्या उष्म्याचा परिणाम माणसांबरोबरच वन्यजीव व पक्ष्यांवर होत आहे. उन्हाचा जास्त फटका पक्ष्यांना बसत असल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे उडताना अचानक खाली पडणे, तारांमध्ये अडकून गंभीर जखमी होणे अथवा पाण्याअभावी पक्षी तडफडून मरतात.  
सध्या चिमण्या, बुलबुल, कोकीळ, पारवे, कावळे,  यांसारखे पक्षी उष्माघाताचे बळी पडत असल्याचे बहुतेक  ठिकाणी आढळून येतात. अशा वेळी सामाजिक संस्था व पक्षिमित्रांनी वन्यजीव व पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रामुख्याने पुढे येऊन पिण्याच्या पाण्याबरोबरच खाण्याचीही सोय करणे गरजेचे आहे.“जिथे घर, तिथे पक्षी पाणवठा’ ही संकल्पना राबवणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात पक्षी बाहेर येतात व निवाऱ्याचा पर्याय न मिळाल्याने उन्हाला बळी पडतात. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांनी इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नये  व शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवावीत.  

> घरावर व  बागांमध्ये  मातीची उथळ भांडी पाण्याने भरलेली ठेवावीत . तसेच  शक्यतो ही पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत. 
> शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवा.
> घर-इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नका. 
> घराच्या परिसरात गच्चीवर, बाल्कनीत  खाण्याची सोयही करावी. 
> पिण्याचे भांडे खोलगट नव्हे, तर पसरट असावे.
> पाणी वेळोवेळी बदलत राहावं व भांडंही स्वच्छ ठेवावे. कारण सतत भांड्यात पाणी राहिल्याने शेवाळाचीही निर्मिती होते आणि पाणी पिण्यास अयोग्य होते.

बातम्या आणखी आहेत...