आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहनतीच्या बळावर राष्ट्रीय कबड्डीपटूची बाेनस कामगिरी; दुसऱ्याच प्रयत्नात यशस्वीपणे बहिणीचे स्वप्न साकारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रचंड मेहनतीच्या बळावर चमकदार कामगिरीने कबड्डीच्या करिअरमध्ये यशाचा पल्ला गाठला. त्याचेच माेठे समाधान हाेते. मात्र, माेठ्या बहिणीची स्पर्धा परीक्षेतील यशासाठी सुरू असलेली धडपड प्रेरणादायी ठरली. यातून तिने दिलेल्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय कबड्डीपटू ज्याेती लघानेने महाराष्ट्र लाेकसेवा अायाेगाच्या परीक्षेत यशाचा पल्ला गाठला. तिने पाेलिस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण हाेत माेठी बहिणी स्वातीची स्वप्नपूर्ती केली.


प्रचंड मेहनत अाणि जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय खेळाडू ज्याेतीने केवळ दुसऱ्याच प्रयत्नामध्ये हे यश संपादन केले. त्यामुळे पैठण तालुक्यातील शेकटा येथील ज्याेतीचे   हे अपार कष्टातून मिळालेले यश निश्चितपणे युवांसाठी प्रेरणादायी ठरणारे अाहे.  यासाठी तिने घेतलेली मेहनत उल्लेखनीय ठरली. 


शेकटा येथील ज्याेतीला वडील अप्पासाहेब यांनी खेळात करिअर करण्यासाठी माेलाचे मार्गदर्शन केले. स्वत: कबड्डीपटू असल्याने त्यांनी मुलीलाही याच खेळासाठी प्राेत्साहित केले. त्यामुळे तिलाही घरातच कबड्डीसाठीचे तंत्रशुद्ध असे मार्गदर्शन लाभत गेले. यातून तिने अल्पावधीत नॅशनल स्कूल गेम्ससाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले. या संघाने २००७-०८ मध्ये फायनल गाठून राैप्यपदकाची कमाई केली. बी.एस्सी. पूर्ण करणाऱ्या ज्याेतीने बीपीएड व एमपीएडचेही शिक्षण घेतले. 


स्पाेर्ट‌्स काेट्यात अाठवी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी ज्याेतीने स्पाेर्ट‌्स काेट्यातून परीक्षा दिली. यामध्ये तिने अाठवी रँकिंग मिळवून घवघवीत यश संपादन केले. 


वडिलांच्या मार्गदर्शनामुळे कबड्डीत करिअर, शिक्षक बहिणीने माझ्यात पाहिले ध्येयपूर्तीचे स्वप्न : ज्याेती 
वडील अप्पासाहेब लघाने यांनी मला स्पाेर्ट‌्समध्ये करिअर करण्यासाठी वेळाेवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळेच मला त्यांच्यासारखेच कबड्डीमध्ये यशस्वी करिअर करता अाले.  त्यामुळे मी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्नही यशस्वीपणे साकारले. असे असतानाच मला शिक्षक असलेल्या माेठी बहिणी स्वातीने एमपीएससी परीक्षेसाठीचे मार्गदर्शन केले. तिने सातत्याने पाठपुरावा केल्याने मला हे यश संपादन करता अाले अाहे, असेही ज्याेतीने सांगितले. 


अभ्यासातील सातत्याने दुसराच प्रयत्न ठरला यशस्वी
- बी.एस्सी.नंतर ज्याेतीने स्पाेर्ट‌्समध्ये पदवी अाणि पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले.  
- एमपीएडनंतर तिने एमपीएससी परीक्षेतून हा पल्ला गाठण्याचा निर्धार  केला.   
- क्लाससह तिने घरीच अभ्यास करण्यातील सातत्य कायम ठेवले.    
- स्पाेर्ट‌्स काेट्यातून तिने अाठवी रँकिंग मिळवून गाठला यशाचा पल्ला.

बातम्या आणखी आहेत...