आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाककृती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेंगदाणा नारळ रोल

साहित्य : दोन वाट्या दाण्याचा कूट, दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं, एक वाटी साखर, अर्धा चमचा वेलची पूड, काजूबदामाचे काप २-३ चमचे, छोटा चमचा तूप.
कृती : सर्वप्रथम साखरेमध्ये पाणी घालून पाक करावा. त्यात वेलची पूड, काजूबदामाचे काप, किसलेलं खोबरं, आणि शेंगदाण्याचं कूट घलून सर्व साहित्य एकत्र करून रोल करावे. हे रोल उपासालाही चालतात.


लाल भोपळ्याची बासंुदी
साहित्य :
एक वाटी लाल भोपळ्याच्या बारीक, दीड वाटी साखर, एक लिटर दूध, दोन चमचे तूप, अर्धा चमचा वेलची पूड, पाव चमचा जायफळ पूड, बदाम, काजू, चारोळी
कृती : गॅसवर जाड पितळेचे कल्हईचे पातेले ठेवून त्यात दोन चमचे तूप घालून त्यावर भोपळ्याच्या फोडी टाकून मंदाग्नीवर वाफ आणावी. थोडे पाणी घालून फोडी मऊ शिजवून घ्याव्या. घोटून एकजीव करावे. नंतर दूध व साखर घालून चटका आणावा व दूध आटेपर्यंत उकळावे. वेलची पूड व जायफळ पूड घालावी. बदाम व काजूचे काप घालावे.

 

उपासाचे बटाटेवडे
साहित्य :
सारणासाठी - एक किलो बटाटे, दोन चमचे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक चमचा मिरपूड, दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा आल्याचं वाटण, चवीनुसार मीठ, तीन चमचे दाण्याचं कूट, दोन चमचे लिंबाचा रस, तूप वा तेल. आवरणासाठी - अर्धा कप शिंगाड्याचं पीठ, अर्धा कप राजगिरा पीठ, अर्धा कप कुट्टूचं पीठ, चवीप्रमाणे मीठ.
कृती : सर्वप्रथम बटाटे उकडून सोलून घ्या व कुस्करून घ्या. त्यात मिरचीचा ठेचा, दाण्याचं कूट, मीठ, कोथिंबीर, मिरपूड हे सर्व साहित्य मिसळून एकजीव करा. एकजीव झालेल्या सारणाचे तळहाताला थोडं पाणी लावून चपटे वडे थापून घ्या. अाता सर्व पीठे एकत्र करून चवीप्रमाणे मीठ घालून पाणी घालून सरबरीत करा. तेल गरम झाल्यावर त्यातून दोन चमचे तेल काढून सरबरीत केलेल्या पिठात मिसळा. नंतर तापलेल्या तेलात चिमूटभर मीठ टाका. म्हणजे वडे तेलकट होत नाहीत.  वडे पिठात घोळवून तळून काढा व गरमागरम वडे चटणीबरोबर वाढा.


- ज्योती मोघे, भोपाळ
jyotimoghe@yahoo.in

बातम्या आणखी आहेत...