आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jyotiraditya Scindia | 63 Years Of Political Journey, Involvement With 5 Characters And 5 Parties; This Royal Family Has Made Big Upsets In Politics

63 वर्षांचा राजकीय प्रवास, 5 पात्र आणि 5 पक्ष; सिंधिया राजघराणे राजकारणातील 'मास्टरस्ट्रोक'साठी आहे प्रसिद्ध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यामुळे सिंधिया कुटुंबाच्या 'राजकारणाच्या कहाणीत' एक नवीन अध्याय जोडला जाणार आहे

कमलेश माहेश्वरी

ग्वालियर/भोपाळ - स्वतंत्र भारताच्या राजकारणामध्ये राजघराण्यांच्या राजकीय वर्तुळात मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-गुनाच्या सिंधिया कुटुंबाची कहाणी अतिशय रंजक आणि गुंतागुंतीची आहे. या कहाणीमध्ये भारतीय राजकारणातील ते डावपेच पाहायला मिळताता जे खुर्चीच्या संघर्षासाठी वापरले जातात. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कान्हेरखेड गावचे पाटील जानकोजीराव यांचे वंशज आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत 27 वेळेस खासदार आणि आमदार राहिले आहे. आकडेवारी आणि अनुभव असे दर्शवतात की राजमाता ते ज्योतिरादित्यपर्यंत या सत्तेमध्ये या कुटुंबाच्या महत्त्वाकांक्षा पक्षांवर  'मास्टरस्ट्रोक' म्हणून भारी पडल्या आहेत.18 वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर वडिलांच्या 75 व्या जयंतीदिवशी ज्योतिरादित्य सिंधियांच्या राजीनाम्यानंतर ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चा आहेत. अशाप्रकारे सिंधिया कुटुंबाच्या 'राजकारणाच्या कहाणीत' एक नवीन अध्याय जोडला जाणार आहे. सिंधिया यांच्या या निर्णयाचे सिंधिया कुटुंब आणि सदस्यांनी स्वागत केले आहे. त्यांची आत्या वसुंधराराजे आणि यशोधराराजे यांनी याला ज्योतिरादित्य यांची घरवापसी म्हटले आहे तर ज्योतिरादित्य यांचे एकुलते एक सुपुत्र महाआर्यमनने याला आपल्या वडिलांचे साहस सांगत ट्विट केले आहे. 

कुटुंबातिल व्यक्ती आणि राजकीय प्रवास

1957 ते 2020 चा प्रवास, 5 पक्षांचे राजकारण

विजया राजे 


काँग्रेस, जनसंघ, जनता पार्टी, भाजप
(8 वेळा खासदार)


1957-गुना -काँग्रेस


1962-ग्वालियर -कांग्रेस


1967-गुना -अपक्ष (पोटनिवडणूक)


1971-भिण्ड -जनसंघ

1989-गुना -भाजप

1991-गुना -भाजप

1996-गुना -भाजपा

1998-गुना -भाजप

माधवराव  जनसंघ,काँग्रेस,मप्र विकास काँग्रे


(9 वेळा खासदर)


1971-गुना -जनसंघ

1977-गुना -अपक्ष

1980-गुना -काँग्रेस

1984-ग्वालियर -काँग्रेस

1989-ग्वालियर -काँग्रेस

1991-ग्वालियर -काँग्रेस

1996-ग्वालियर -मप्र विकास काँग्रेस  

1998-ग्वालियर -काँग्रेस


1999-गुना -काँग्रेस

वसुंधरा राजे  भाज


(5 वेळा खासदार, 5 वेळा आमदार)


1984 - भिंड - भाजप (पराभव)

1989 ते 2004 - झालावाडमधून भाजपच्या तिकीटावर सगल 5 वेळा खासदार, 

1985 -2018 मध्ये 5 वेळा आमदार

यशोधरा राजे भाजप


(5 वेळा आमदार, 1 वेळा खासदार)


1998 - शिवपुरी -भाजप

 2003 - शिवपुरी -भाजप

2007- ग्वालियर लोकसभा (पोटनिवडणूक) -भाजप   

2013 आणि 2018 - शिवपुरी -भाजप

ज्योतिरादित्य काँग्रेस, आता भाजपमध्ये जाण्याची शक्यता


(4 वेळा खासदार)


2002-गुना -  काँग्रेस (पोटनिवडणूक)


2004-गुना - काँग्रेस

2009-गुना - काँग्रेस

2014-गुना - काँग्रेसराजमासता विजयाराजे यांचा राजकीय प्रवास
देशातील राजघराण्यांच्या विलयानंतर राजमातेचे पती जीवाजीराव यांनी स्वातंत्र्य भारतात सिंधिया कुटुंबाचा मान वाढवला. त्यादरम्यान काँग्रेस सर्व देशात पसरली होती, पण जीवाजीराव यांना राजकारणापेक्षा आपल्या राज्याला सांभाळण्यात जास्त रस होता. अनेक काँग्रेस नेत्यांच्या विनंतीनंतर ते आपली पत्नी राजमाता विजयाराजे यांना राजकारणात उतरवण्यासाठी तयार झाले. चार मुली आणि एक मुलगा माधवराव यांची आई विजयाराजे यांनी पहिल्यांदा 1957 मध्ये गुना मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून विजय मिळवला. 

माधवराव सिंधिया यांचा राजकीय प्रवास


विजयाराजेंच्या सक्रिय करिअरदरम्यान त्यांचे पुत्र माधवरावदेखील राजकारणात उतरले. 1971 मध्ये आईच्या पाऊलावर पाऊळ टाकत ते गुना मतदारसंघातून जनसंघाच्या तिकीटावर निवडणूक लढले आणि सलग 1999 पर्यंत 9 वेळा खासदार बनले. त्यांच्या आईंनी चार पक्षातून आपली राजकीय वाटचाल वाढवली तर मुलगा माधवराव यांनी जनसंघ, अपक्ष, काँग्रेस आणि स्वतःच्या मप्र विकास काँग्रेस पार्टी स्थापन करुन राजकारण केले.

वसुंधरा राजेंचा राजकीय प्रवास


राजमाता विजयाराजे यांची चौथी संतान आणि माधवरावांपेक्षा 8 वर्षे लहान वसुंधरा यांनी आईसोबत राहून भाजपमध्ये गेल्या आणि 1984 मध्ये मध्य प्रदेशच्या भिंडमधून निवडणूक लढवली. पण, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात काँग्रेसला भावनिक राजकारणातून मतदान मिळाले आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर वसुंधरा यांनी आपले सासर राजस्थानकडे मोर्चा वळवला आणि धौलपुर, झालरापाटन आणि झालावाडमध्ये सक्रिय होऊन भाजपची वाढ केली.  वसुंधरा सिंधिया कुटुंबातील एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांनी पाच वेळा विधानसभा आणि पाच वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे.  

यशोधरा राजेंचा राजकीय प्रवास


सिंधिया कुटुंबातील सर्वात लहान मुलगी यशोधरा यांचा राजकीय प्रवास खूप लहान आहे. स्वभावाने शांत यशोधरा वसुंधरा राजेंपेक्षा एक वर्ष लहान आहेत, पण पक्षात असूनही त्यांचा राजकीय प्रवास वेगळा आहे. त्यांची गिनती राज्यातील मोठ्या नेत्यामध्ये केली जाते, पण सक्रिय नसल्यामुळे मोठ्या पदावर जागा मिळू शकली नाही. यशोधरा राजेंनी शिवपुरीमधून 1998 आणि 2003 मध्ये दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली. शिवराज सरकारमध्ये त्यांना उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय सांभाळण्याची जबाबदारी मिळाली.

ज्योतिरादित्य सिंधिया यांचा राजकीय प्रवास


1 जानेवारी 1971 ला माधवराव सिंधिया यांच्या कुटुंबात ज्योतिरादित्य यांचा जन्म झाला. अफाट संपत्तीसह त्यांना राजकीय वारसादेखील मिळाला. 2001 मध्ये मैनपुरीमध्ये वडिलांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य यांना राजकारणात यावे लागले. 2002 पासून त्यांनी आपल्या वडिलांच्या पाउलावर पाऊल टाकत 2002 ते 2014 पर्यंत चार वेळा लोकसभा निवडणूक जिंकली. 2019 मध्ये त्यांना गुना मतदारसंघातून भाजपच्या केपी सिंह यादव यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.