आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jyotiraditya Scindia BJP | Jyotiraditya Scindia BJP Joining Today Latest News And Updates Over Kamal Nath Madhya Pradesh Govt Political Crisis

२२ काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपत; खासदारकी अन् मंत्रिपदही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिंधिया समर्थकांची मागणी- भाजपमध्ये प्रवेश न करता वेगळा पक्ष काढावा
  • शिंदेंनी ४ वेळा मोदींचे नाव घेतले, शिवराज यांचा उल्लेख नाही

नवी दिल्ली/ भोपाळ - मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांना भाजपचे सदस्यत्व दिले. नड्डा म्हणाले, “ज्योतिरादित्य यांचे आक्रमक नेतृत्व आम्हाला माहिती आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांना मुख्य प्रवाहात कार्य करण्याची संधी मिळेल.’ दरम्यान, शिंदे यांनी मनोगत मांडताना १० मिनिटांच्या भाषणात काँग्रेस सोडण्याचे कारण तर सांगितलेच, शिवाय पंतप्रधान मोदी हे सशक्त नेते असल्याचे सांगितले. त्यांनी चार वेळा मोदींचे नाव घेतले. मात्र, मध्य प्रदेश भाजपचे मुख्य नेते शिवराजसिंह चौहान यांचे नावही घेतले नाही, तर दुसरीकडे, शिवराजसिंह यांनी शिंदे यांच्या आत्या भाजप नेत्या यशोधराराजे शिंदे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत ज्योतिरादित्य यांची स्तुती केली. ट्विट केले, “स्वागत है महाराज, साथ है शिवराज.’ दिल्लीत शिंदे भाजपवासी झाले, तर भोपाळमध्ये भाजपने शिंदे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊ केली. सूत्रांनुसार, शिंदे यांना मोदी सरकारमध्ये मंत्रिपदही दिले जाऊ शकते. याच अटीवर शिंदे भाजपात आले आहेत.



शिंदे यांच्या आत्या यशोधराराजे म्हणाल्या, आज अम्मांची (विजयाराजे) अखेरची इच्छा पूर्ण झाली | माधवराव यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी अम्मांची शेवटची इच्छा होती. मात्र, ते घडू शकले नाही. आज ज्योतिरादित्य यांनी ही इच्छा पूर्ण केली.



नव्या विचारांना संधीच नाही : शिंदे
> काँग्रेसला वास्तव परिस्थिती कळणे कठीण आहे. { आधुनिक विचारप्रणालीला पक्षात सध्या कोणतेही स्थान नाही.
> मी मप्रसाठी बरीच स्वप्नं पाहिली. मात्र, १८ महिन्यांतच ती भंगली.



माझ्या घरी कधीही प्रवेश असलेले शिंदे काँग्रेसचे एकमेव नेते होते : राहुल गांधी

सोनिया-राहुल यांनी शिंदेंना भेटीची वेळ दिली नाही, अशा बातमीविषयी बोलताना राहुल यांनी हे वक्तव्य केले.



भाजपतर्फे उदयनराजे, आठवले 

राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली.  आरपीआय (ए)चे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासाठी  एक जागा देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे अमरीश पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.



१० मार्च का निवडला? : ३० सप्टेंबर २००१ या दिवशी माझ्या पित्याचे निधन झाले आणि १० मार्च २०२० रोजी त्यांची ७५ वी जयंती होती. याच दिवशी ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस सोडली.

२२ बंडखोर बंगळुरू, १०५ मानेसर, ८० जयपूरच्या रिसॉर्टमध्ये :


भाजपकडे एकूण १०७ आमदार असून यातील १०५ आमदार रात्री भोपाळमधील पक्षाच्या मुख्यालयातून बसने विमानतळाकडे पाठवण्यात आले. त्यांना हरियाणातील मानेसर येथे आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच काँग्रेसचे ८० आमदार जयपूरमधील एका रिसॉर्टमध्ये आहेत. तेथे अशोक गहलोत त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. काँग्रेसचे १४ निष्ठावंत आमदार मात्र भोपाळमध्येच आहेत. तिकडे बंगळुरूमध्ये पमा मोडोज रिसॉर्टमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी शिंदेसमर्थक आमदारांना ठेवण्यात आले आहे. तेथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र लक्ष ठेवून आहेत.



> २२ बंडखोरांपैकी १३ परत येतील, असा दावा दिग्विजयसिंह यांनी केला. बंडखोर आमदारांनी आमदारकी सोडली आहे. सभागृहात बहुमत चाचणीची वाट पाहा, असे ते म्हणाले. 



> कमलनाथ सरकार पडणारच. असे शिवराजसिंह म्हणाले. 

>  लवकरच शिवराजसिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल : यशोधरा राजे