आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमळाला ‘ज्याेती’ची साथ; कमल'अ'नाथ, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडली, आता भाजपबरोबर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फाेटाे कमलनाथ यांच्या शपथग्रहण साेहळ्याचा अाहे. यात शिवराजसिंहसुद्धा पाेहाेचले हाेते. - Divya Marathi
हा फाेटाे कमलनाथ यांच्या शपथग्रहण साेहळ्याचा अाहे. यात शिवराजसिंहसुद्धा पाेहाेचले हाेते.

नवी दिल्ली / भोपाळ : तब्बल बावीस तासांच्या नाही - हो, हो - नाहीनंतर अखेर ज्योतिरादित्य सिंधिया यांचा राजीनामा आला. होळीच्या दिवशी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी सिंधिया यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चिठ्ठीचे ट्विट केले. परंतु ही चिठ्ठी त्यांनी ९ मार्चला लिहिली होती. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांनंतर काँग्रेसने सिंधिया यांना पक्षातून काढून टाकले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सिंधिया यांच्या गोटातील १९ आमदारांनी स्वहस्ताक्षरातील राजीनामापत्र विधानसभा अध्यक्षांना पाठविले. काँग्रेसचे हे सर्व आमदार सोमवारपासूनच बंगळुरूमध्ये थांबले आहेत. 

  • 12.35 PM बंगळुरूमध्ये थांबलेल्या सिंधिया यांच्या गोटातील १९ आमदारांचेसुद्धा राजीनामे
  • 12.10 PM शिंदे यांनी ९ मार्चला लिहिला राजीनामा, दहाला तो दिला
  • 11.50 AM अमित शहा यांच्यासोबत सिंधिया पीएम नरेंद्र मोदींना भेटले

यशोधरा यांनी म्हटले, आमच्या स्वप्नांना पूर्ण करतील

ते अम्मा विजयाराजे सिंधिया यांच्या स्वप्नांना पूर्ण करतील. माझ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की ते काँग्रेसला सोडून आता भाजपमध्ये आले आहेत. त्यांचा सन्मान आणि पद पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व आता ठरवतील. - यशोदाराजे, भाजप आमदार आणि ज्योतिरादित्य यांची आत्या

कुणी म्हटले गद्दार तर कुणी विश्वासघातकी

ट्विटरवर सिंधे परिवार गद्दार आहे यावर २६ हजार लोकांनी ट्विट केले आहे. तर सिंधिया यांचे समर्थन करणारे ६१ हजार ट्विट आहेत.


१९५७ मध्ये झाशीच्या राणीच्या मृत्यूनंतर एक इतिहास बनला होता. त्यानंतर १९६८ मध्ये संविद सरकार यांच्या रूपाने एक इतिहास बनला होता आणि आज आता पुन्हा इतिहास बनत आहे. तिघांमध्ये म्हटले आहे की, हां आम्ही आहोत. - जीतू पटवारी

जे भाजप राजमातांना विसरले. ज्यांनी कधी आत्या यशोधरा यांचा सन्मान केला नाही. ते आता पुतण्याला कसे आपलेसे करतील. जो भाजप त्यांना सुरुवातीपासून गद्दार म्हणत आहे तो काय आता त्यांना देशभक्त म्हणू लागेल - नरेंद्र सलुजा

सिंधिया यांनी घेतलेल्या पवित्र्याबद्दल मला जराही दुःख वाटत नाही. सिंधिया यांच्या खानदानाने स्वातंत्र्य चळवळीतही इंग्रजांचे सरकार आणि त्यांना साथ देणाऱ्या लोकांची पहिल्या रांगेत उभे राहून मदत केली होती. - अरुण यादव

  • नाथ सरकार राहणार की नवे सरकार बनणार... दोन पर्याय

१. मध्य प्रदेशात सरकार कमलनाथ यांचे राहणार की भाजपचे हे फ्लोअर टेस्टनंतरच स्पष्ट होईल. सरकार बनविणाऱ्याला विश्वासमत जिंकून दाखवावे लागेल.

संकटात सरकार... सिंधिया समर्थक सहा मंत्र्यांसोबत तेरा आमदार आणि कर्नाटकमधून परतल्यानंतर कमलनाथ यांच्यासोबत उभे राहणारे बिसाहूलाल सिंह यांनी राजीनामा दिला आहे. एंदलसिंह कंसानासुद्धा लवकरच राजीनामा देऊ शकतात. २० आमदारांच्या राजीनाम्यानंतर हे स्पष्ट आहे की काँग्रेसजवळ आता ९४ चा तर भाजपकडे १०७ चा आकडा आहे. आता जर ४ अपक्ष, दोन बसप आणि एक सपाचा आमदार काँग्रेससोबत गेल्यास त्यांच्या गोटातील आकडा १०१ वर जाईल. अशावेळी त्यांना भाजपच्या चार आमदारांची गरज पडेल.

२. कायदा व्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्यपाल लालजी टंडन मुख्य भूमिकेत येतील आणि राष्ट्रपती शासनाची शिफारस करू शकतील.

तोडफोडीची वेळ... काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, सज्जनसिंह वर्मा, उमंग सिंघार दावा करत आहे की कमलनाथ सरकार पुन्हा बहुमत सिद्ध करू शकेल. सिंधिया यांच्या राजीनाम्यानंतर आता आमदारांच्या तडजोडीला वेग येईल. सपा आमदार राजेश शुक्ला आणि बसप आमदार रमाबाई व संजीव कुशवाह हे सुद्धा भाजपच्या गोटाबरोबर दिसू लागल्याने ते काँग्रेससाठी अडचणीचे होऊ शकते. अपक्ष आमदारसुद्धा लवकरच कुठल्या गटात जातील यावर ठोकताळे लावले जात आहेत.

शिंदे यांच्या गोटातील सहा मंत्र्यांना निलंबित करण्याची शिफारस

सिंधिया यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांच्या गोटातील सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून निलंबित करण्यासाठी शिफारस केली आहे. याबाबत त्यांनी राज्यपाल लालजी टंडन यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये गोविंदसिंह राजपूत, महेंद्रसिंह सिसोदिया, इमारती देवी, तुलसी सिलावट, प्रद्युम्नसिंह तोमर आणि प्रभूराम चौधरी यांचा समावेश आहे. कमलनाथ यांनी या मंत्र्यांना तातडीने हटवण्याचा आग्रह केला आहे.

विधानसभा अध्यक्षांची भूमिका सर्वात महत्त्वपूर्ण

मध्य प्रदेशच्या राजकारणात आता विधानसभा एनपी प्रजापती यांची भूमिका सर्वात महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आता ते ठरवतील कधी आणि किती आमदारांच्या राजीनाम्यावर काय निर्णय घ्यायचा. दुसरीकडे भाजप नेता भूपेंद्रसिंह यांनी बंगळुरूतून १९ आमदारांच्या हस्ताक्षरातील राजीनामे स्पीकरला पाठविले आहेत. स्पीकर आता यावर अंतिम निर्णय घेतील.

वडिलांवर गर्व, राजीनामा देण्यासाठी धाडस पाहिजे

वडिलांच्या निर्णयावर गर्व वाटत आहे. राजीनामा देण्यासाठी धाडस पाहिजे. आमचा परिवार आणि आम्ही कधीही सत्तेसाठी भूकेले नव्हतो. याचा इतिहासही साक्षीदार आहे. - महाआर्यमन, ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मुलगा