आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याेतिरादित्य : २ तास उशिराने आले, अर्ध्या मिनिटात सत्कार स्वीकारले, ५ मिनिटांत भाषण करून निघाले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर  - काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी पक्षाच्या छाननी समितीचे प्रमुख ज्याेतिरादित्य सिंधिया यांची गुरुवारी दुपारी ३ वाजता साेलापुरात सभा आयाेजित केली हाेती. मात्र, लातूर येथील सभा आटोपून येण्यास त्यांना दोन तास उशीर झाला. लाेक ताटकळले हाेते. गाडीतून उतरून, गर्दी कापत घाईगडबडीत सिंधियांनी व्यासपीठ गाठले. एका हातात फुलांचा गुच्छ स्वीकारत दुसऱ्या हाती माइक घेतला. अवघ्या पाच ते सात मिनिटांत भाषण उरकले व धावतच ते स्टेजवरून उतरले आणि दुसऱ्या सभेसाठी रवाना झाले.

छाया : रामदास काटकर