आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Jyotiraditya Scindia Most In Limelight This Time. Because The Veteran Congress Leader Recently Joined The BJP, Hence The Madhya Pradesh Government Is In Trouble

यावेळी सर्वाधिक चर्चेत. कारण कांग्रेसचे हे दिग्गज नेते अलिकडेच भाजपमध्ये दाखल झाले, त्यामुळे मध्यप्रदेश सरकार संकटात सापडले आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ३७४ काेटी रुपयांच्या संपत्तीचे मालक क्रिकेट प्रशासक, बँकरही हाेते शिंदे
  • त्या ४ गाेष्टी, ज्या शिंदे यांना अन्य नेत्यांपेक्षा वेगळे ठरवतात

> जन्म : १ जानेवारी १९७१ > शिक्षण :  अर्थशास्त्रातील पदवी (हार्वर्ड विद्यापीठ) एमबीए स्टॅनफाेर्ड स्कूल ऑफ बिझनेस > संपत्ती : अंदाजे ३७० काेटी रुपये    ४९ वर्षांच्या ज्याेतिरादित्य शिंदे यांनी सहा महिने अगाेदर साेशल मीडिया अकाउंटवरील आपला परिचय बदलला हाेता. नव्या परिचयात काँग्रेसचा काेणताही उल्लेख नव्हता. आपल्या नवीन परिचयात क्रिकेट जिज्ञासू व लाेकसेवक लिहिले हाेते. मात्र त्या वेळी काँग्रेस साेडण्याच्या गाेष्टींचा इन्कार केला हाेता. पण आता भाजपमध्ये जाताच ही गाेष्ट स्पष्ट झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर शिंदे आपल्या मनातील गाेष्टी बाेलत हाेते. सप्टेंबर २००१ मध्ये ज्योतिरादित्य यांचे वडील आणि काँग्रेस नेते माधवराव शिंदे यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. २००२ मध्ये त्यांनी प्रथमच गुनातून लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या आणि खासदार झाले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईच्या कॅम्पियन स्कूल आणि नंतर डून स्कूल डेहराडून येथे  पूर्ण केले. त्यानंतर ते शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. अमेरिकन गुंतवणूक कंपनी मेरिल लिंचबरोबर काम केले. मॉर्गन स्टॅन्लेच्या न्यूयॉर्क, हाँगकाँग आणि मुंबई येथील कार्यालयांमध्ये काम केले. डिसेंबर १९९१ मध्ये त्यांची दिल्लीत प्रियदर्शिनीशी भेट झाली. नंतर डिसेंबर १९९४ मध्ये त्यांचे लग्न झाले. ज्याेतिरादित्यांनी कार रेसिंगचा काेर्स केला आहे. वन्यप्राणी छायाचित्रकार आहेत. क्रिकेट, बिलियर्ड आणि पाेलाे त्यांचे आवडीचे खेळ आहेत. शिवाय त्यांना व्हिंटेज गाड्या खास पसंत आहेत. त्यांना थोर पुरुष आणि यशस्वी लोकांचे आत्मचरित्र तसेच अर्थविषयक पुस्तकांमध्ये स्वारस्य आहे. शिंदे यांच्याकडे ३५.३२ काेटी रुपयांच्या खासगी संपत्तीसह ३३७ काेटी रुपयांची वडिलाेपार्जित स्थावर-जंगम मालमत्ता आहे. यामध्ये ११.७१ काेटी रुपयांच्या दागिन्यांसह ४० काेटी ८६ लाख रुपयांची स्थावर-जंगम आणि २९७ काेटी रुपयांची अचल संपत्ती आहे. १० लाख रुपयांचे शेअर्स आहेत. १९६० चे बीएमडब्ल्यू माॅडेल त्यांची खास पसंत आहे. रेंज राेव्हरही आवडते. अलीकडेच त्यांनी ग्वाल्हेरच्या व्यापार मेळ्यात अल्ट्रूरस आणि एन्डेव्हर खरेदी केली.

त्या ४ गाेष्टी, ज्या शिंदे यांना अन्य नेत्यांपेक्षा वेगळे ठरवतात

1. देशातील सर्वात जास्त शिकलेल्या खासदारांपैकी एक -


ज्याेतिरादित्य शिंदे काही निवडक उच्चशिक्षित खासदारांपैकी एक आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कॅम्पियन स्कूल मुंबई आणि नंतर डून स्कूल डेहराडूनमध्ये झाले. त्यानंतर शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेत गेले. हाॅर्वर्डल विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्टॅनफाेर्ड स्कूल आॅफ बिझनेसमधून एमबीए केले.

2. एमपीसीएचे अध्यक्ष आहेत - 


ज्योतिरादित्य मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हाेते. क्रिकेट, बिलियर्ड, पाेलाे त्यांचे आवडते खेळ आहे.3. कार रेसिंगचा काेर्स केला आहे -

शिंदे यांना विंटेज गाड्या खास पसंत आहेत. हा फाेटाे शिंदे यांच्या कलेक्शनमधील एक १९६० ची तीनचाकी, बीएमड्ल्ब्यू लेस्टाची आहे. त्यांना रेंज राेव्हरही आवडते. अलीकडेच त्यांनी ग्वाल्हेरच्या मेळ्यातून अल्टूरस आणि अॅव्हेंडर कार खरेदी केली. त्यांनी कार रेसिंगचाही काेर्स केला आहे.4. यूपीएचे श्रीमंत मंत्री 


शिंदे देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांमध्ये माेडतात. काही माध्यमांच्या नुसार त्यांच्याकडे एकूण अंदाजे २५ हजार काेटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये त्यांच्या वडिलाेपार्जित जय विलास पॅलेसचा समावेश आहे. अधिकृतपणे त्यांच्याकडे ३५.३२ काेटी रुपयांची खासगी संपत्ती आहे. त्याचबराेबर वडिलाेपार्जित ३३७ काेटी रुपयांची चल- अचल संपत्ती आहे.