Election Result / अनपेक्षित पराभव : मोदी त्सुनामीत ज्योतिरादित्य शिंदे, मेहबूबा मुफ्ती यांसह देशभरात अनेक दिग्गजांचा अनपेश्रित पराभव

आपला गड राखण्यात दिग्गजांना अपयश, पराभूतांमध्ये माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय मंत्र्याचा समावेश
 

दिव्य मराठी

May 24,2019 11:31:00 AM IST

दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकार जाहीर झाला असून यावेळी पुन्हा एकदा मोदींची लाट नाही तर त्सुनामी पाहण्यात मिळाली. यावेळी एकट्या भाजप पक्षाने 300 चा आकडा पार केला आहे. या मोदी त्सुनामीत अनेक राज्यांतील दिग्गजांचा अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. आपला बालेकिल्ला देखील या उमेदवारांना स्वतःच्या ताब्यात ठेवता आला नाही. ज्योतिरादित्य शिंदे, महेबुबा मुफ्ती, डिंपल यादव यांसारखे अनेक दिग्गज या मोदी त्सुनामीत वाहुन गेल्याचे दिसले.

ज्योतिरादित्य शिंदे, काँग्रेस (गुणा, मध्य प्रदेश)

गेल्या २० वर्षांत शिंदे प्रथमच गुणा येथून हरले. ४ वेळा खासदार राहिले. त्यांना भाजपच्या के. पी. यादव यांनी पराभूत केले.

> गेल्या ७० वर्षांत शिंदे राजघराण्याच्या बालेकिल्ल्यात प्रथमच पराभव. काँग्रेसने त्यांच्यावर पश्चिम यूपी जिंकण्याची जबाबदारी सोपवली होती. गणा येथे ३ दशकांनंतर शिंदे कुटुंबाबाहेरचे कोणी जिंकले आहे.

या निवडणुकीत कोणत्या दिग्गजांचा पराभव झाला जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.......

भूपेंद्र सिंह हुड्डा, काँग्रेस सोनीपत, हरियाणा भाजपच्या रमशेचंद्र कौशिक यांनी पराभूत केले. ओमप्रकाश चौटालांचे नातू दिग्विजयसिंह यांनीही नुकसान केले. > जाट जागा असल्याने हरियाणाचे माजी सीएम हुड्डांना काँग्रेसने उतरवले होते. त्यांची पत्नी येथीलच आहे. हरियाणा सीएम मनोहर लाल खट्टर यांनी प्रचारादरम्यान त्यांना बाहेरचे म्हटले होते.मेहबूबा मुफ्ती, पीडीपी अनंतनाग, जम्मू-काश्मीर अनंतनाग मतदारसंघातून माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव. त्यांना नॅशनल कॉन्फरन्सचे हसनैन मसुदींनी पराभूत केले. > जम्मू-काश्मीरची सत्ता गमावल्यानंतर मेहबूबा मुफ्ती सतत मोदी सरकारविरुद्ध बोलत होत्या. निवडणूक निकालात त्यांना तिसरे स्थान मिळाले. हा मेहबूबा मुफ्ती यांचा निवडणुकीतील पहिला पराभव आहे.एच. डी. देवगौड़ा, जेडीएस तुमकूर मतदारसंघ, कर्नाटक माजी पंतप्रधान देवेगौडा तुमकूर जागवेरून पराभूत झाले. भाजपच्या जी. एस. बसवराज यांनी त्यांना पराभूत केले. > कर्नाटकात मुलाचे सरकार आणि काँग्रेसचा हात;सोबत असूनही देवेगौडांना फायदा झाला नाही. ही लोकसभा निवडणूक देवेगौडांची शेवटची निवडणूक मानली जात होती.मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस गुलबर्गा , कर्नाटक खरगे कर्नाटकच्या गुलबर्गा येथून पराभूत झाले. त्यांना भाजपचे उमेश जी. जाधव यांनी सुमारे एक लाख मतांनी हरवले. > खरगेंचा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. ते लोकसभेत काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते होते.डिंपल यादव, सपा कन्नौज, उत्तर प्रदेश कन्नौज येथून आतापर्यंत खासदार राहिलेल्या डिंपल यंदा पराभूत झाल्या. त्यांना भाजपचे सुव्रत पाठक यांनी हरवले. > महाआघाडीमुळे डिंपल यांना यंदा बसपच्या मतदारांची साथ मिळाली. काँग्रेसनेही पाठिंबा दिला. तरीही पराभव झाला. डिंपल यांनी २०१४ मध्ये पाठक यांना हरवले होते, त्यांच्याकडूनच त्या पराभूत झाल्या.अशोक गजपती राजू, टीडीपी विजयानगरम, आंध्र प्रदेश मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले राजू टीडीपीसोबत होते. त्यांना वायएसआर काँग्रेसचे बी. चंद्रशेखर यांनी पराभूत केले. > विजयानगरम राजघराण्याचे राजू २०१४ मध्ये हीच जागा जिंकून मंत्री झाले होते, पण वायएसआरच्या लाटेत ते जागा वाचवू शकले नाहीत.

भूपेंद्र सिंह हुड्डा, काँग्रेस सोनीपत, हरियाणा भाजपच्या रमशेचंद्र कौशिक यांनी पराभूत केले. ओमप्रकाश चौटालांचे नातू दिग्विजयसिंह यांनीही नुकसान केले. > जाट जागा असल्याने हरियाणाचे माजी सीएम हुड्डांना काँग्रेसने उतरवले होते. त्यांची पत्नी येथीलच आहे. हरियाणा सीएम मनोहर लाल खट्टर यांनी प्रचारादरम्यान त्यांना बाहेरचे म्हटले होते.

मेहबूबा मुफ्ती, पीडीपी अनंतनाग, जम्मू-काश्मीर अनंतनाग मतदारसंघातून माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव. त्यांना नॅशनल कॉन्फरन्सचे हसनैन मसुदींनी पराभूत केले. > जम्मू-काश्मीरची सत्ता गमावल्यानंतर मेहबूबा मुफ्ती सतत मोदी सरकारविरुद्ध बोलत होत्या. निवडणूक निकालात त्यांना तिसरे स्थान मिळाले. हा मेहबूबा मुफ्ती यांचा निवडणुकीतील पहिला पराभव आहे.

एच. डी. देवगौड़ा, जेडीएस तुमकूर मतदारसंघ, कर्नाटक माजी पंतप्रधान देवेगौडा तुमकूर जागवेरून पराभूत झाले. भाजपच्या जी. एस. बसवराज यांनी त्यांना पराभूत केले. > कर्नाटकात मुलाचे सरकार आणि काँग्रेसचा हात;सोबत असूनही देवेगौडांना फायदा झाला नाही. ही लोकसभा निवडणूक देवेगौडांची शेवटची निवडणूक मानली जात होती.

मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस गुलबर्गा , कर्नाटक खरगे कर्नाटकच्या गुलबर्गा येथून पराभूत झाले. त्यांना भाजपचे उमेश जी. जाधव यांनी सुमारे एक लाख मतांनी हरवले. > खरगेंचा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. ते लोकसभेत काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते होते.

डिंपल यादव, सपा कन्नौज, उत्तर प्रदेश कन्नौज येथून आतापर्यंत खासदार राहिलेल्या डिंपल यंदा पराभूत झाल्या. त्यांना भाजपचे सुव्रत पाठक यांनी हरवले. > महाआघाडीमुळे डिंपल यांना यंदा बसपच्या मतदारांची साथ मिळाली. काँग्रेसनेही पाठिंबा दिला. तरीही पराभव झाला. डिंपल यांनी २०१४ मध्ये पाठक यांना हरवले होते, त्यांच्याकडूनच त्या पराभूत झाल्या.

अशोक गजपती राजू, टीडीपी विजयानगरम, आंध्र प्रदेश मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले राजू टीडीपीसोबत होते. त्यांना वायएसआर काँग्रेसचे बी. चंद्रशेखर यांनी पराभूत केले. > विजयानगरम राजघराण्याचे राजू २०१४ मध्ये हीच जागा जिंकून मंत्री झाले होते, पण वायएसआरच्या लाटेत ते जागा वाचवू शकले नाहीत.
X
COMMENT