आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jyotiraditya Sindhia Resigns As General Secretary Of All India Congress Committee

काँग्रेसचे राजीनामा सत्र सुरूच; काँग्रेस सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला पदाचा राजीनामा, ट्विटरवरून कळवली माहीती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ(मध्यप्रदेश)- काँग्रेस अध्यक्षा राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेले राजीनामा सत्र सुरूच आहे. नुकतंच मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आज(रविवार) त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधींप्रमाणेच ट्विटरच्या माध्यमातून ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनाम्याची माहिती दिली.


काय म्हणाले ज्योतिरादित्य शिंदे
"नागरिकांचा निर्णय स्वीकारत आणि त्याची पूर्ण जबाबदारी घेत, मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा राहुल गांधीकडे सुपूर्द केला आहे. माझ्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवून विश्वास दर्शवला आणि मला पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो", असे ट्वीट त्यांनी केले.

 

 


गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरुच आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनीही राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्रातही काँग्रेसला राजीनाम्याचे ग्रहण लागले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनामा सत्रामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...