आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ठेवले आजी व वडिलांच्या पावलावर पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - काँग्रेसचे बंडखाेर नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी पक्षाला रामराम ठोकत आपल्या आजी विजयाराजे सिंधिया आणि वडील माधवराव सिंधिया यांच्या आक्रमकपणाची आठवण करून दिली. ज्योतिरादित्य यांच्या आत्या यशोधराराजे आणि वसुंधराराजे हे आधीपासून भारतीय जनता पक्षात आहेत. मध्य प्रदेशाच्या निर्मितीपासून सिंधिया राजघराणे सत्तेत असून ज्योतिरादित्य तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करीत आहेत. यापूर्वीच्या दोन पिढ्या म्हणजे विजयाराजे आणि वडील माधवराव सिंधिया यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत नुसतेच काँग्रेसला अडचणीत टाकले. परंतु त्यांच्या राजकरणाचा प्रवासही कठीण करून टाकला. अाता ज्योतिरादित्यही त्यांच्याच पावलावर पावले ठेवत असल्याचे दिसत आहे. सिंधिया राजघराण्याचा राजकारणाचा प्रवास आणि त्यांच्या बंडखोर प्रवृत्तीबद्दल बोलायचे झाले तर एक गोष्ट साफ दिसते की, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आजी विजयाराजे सिंधिया यांनी १९५७ मध्ये आपला राजकीय प्रवास सुरू केला आणि त्या लाेकसभेवर निवडून येत संसदेच्या सदस्य बनल्या. परंतु केवळ दहाच वर्षे काँगेसमध्ये राहिल्या. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले आणि डी. पी. मिश्रा मुख्यमंत्री बनले. परंतु नंतर काँग्रेसच्या ३६ आमदारांनी विजयाराजेंबद्दल आपली निष्ठा जाहीरपणे दर्शवत विरोधी भूमिका स्वीकारल्याने डी. पी. मिश्रांना राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसत आहे. ज्योतिरादित्य यांच्या गोटात आपला राजीनामा देत आता २० काँग्रेसी आमदार आलेले आहेत. हा राजीनामा जर स्वीकारण्यात आला तर कमल नाथ यांच्या सरकारचे विधानसभेत अल्पमत सिद्ध होईल. यातच भाजप कमलनाथ सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडेल आणि कमल नाथ यांचे सरकार पडेल. विजयाराजे सिंधिया आणि त्यांचे चिरंजीव माधवराव सिंधिया जवळपास सहा वर्षे एकत्र राहिले. परंतु १९७७ मध्ये दोघांचे मार्ग बदलले. माधवराव १९८० मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि केंद्रीय मंत्रीही बनले. त्या काळी माधवराव काँग्रेसचे एक ताकदवान नेते बनले होते. परंतु या दरम्यान काही तात्विक मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेसला रामराम करत विकास काँग्रेस नामक पक्षाची स्थापना केली. २००१ मध्ये त्यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर २००१ मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी वडिलांचा वारसा घेतला. गुणाच्या जागेवर फेर निवडणुका होत ज्योतिरादित्य सिंधिया तेथून निवडून आले. २००२ च्या पहिल्या विजयानंतर पुन्हा कधीच ज्योतिरादित्य सिंधिया यांना अपयश आले नाही. परंतु २०१९ मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठा धक्का बसला. त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. जवळपास दीड शतक राज्यात काँग्रेसला सत्तेत ठेवण्यात ज्योतिरादित्य सिंधिया यांचा सिंहाचा वाटा होता. परंतु भाजपने सिंधिया यांच्यावरच आपले लक्ष्य साधले. त्यानंतर कमल नाथ यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले. परंतु सिंधिया यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनविण्यात आले. पण असे झाले नाही.

ही तर ज्योतिरादित्य यांची घर वापसी : यशोधराराजे
ज्योतिरादित्य यांच्या आत्या यशोधराराजे सिंधिया आणि वसुंधराराजे सिंधिया भाजपच्या अग्रणी नेत्या अाहेत. आता ज्योतिरादित्य यांच्या काँग्रेस सोडण्याने त्या आनंदीत आहेत. यशोधराराजे यांनी ज्योतिरादित्य यांची ही घरवापसी असल्याचे म्हटले. त्या म्हणाल्या की, “राजमातांच्या रक्ताने राष्ट्रहिताचा निर्णय घेतला आहे. एकत्र जाऊ, नवा देश बनवू, आता दुरावा मिटला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे काँग्रेस सोडणे हे धाडसी पाऊल असून त्यांचे मी मनापासून स्वागत करते. तर तिकडे, वसुंधरा राजे ही विविध टीव्ही चॅनल्सवरती भाच्याच्या या येण्याबद्दल स्वागतार्ह बोलत असल्याचे दिसू लागले आहे.’

मागील काही वर्षांपासून त्यांचे पक्षात मतभेद सुरूच होते आणि राज्यसभा निवडणुकांवेळी त्यांची उपेक्षाच झाली. त्यामुळे नाराज सिंधिया यांनी नवा मार्ग चोखाळला, ज्यामुळे आता मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकारच अडचणीत पडले आहे.

१९६७ ला विजयाराजेंनी जनसंघात प्रवेश केल्यावर जनसंघाची ताकद वाढली. या राजघराण्याचा या क्षेत्रावर काय प्रभाव आहे? हे १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांची लाट असतानाही या प्रदेशातून जनसंघाचे तीन जण निवडून आले होते, यावरून दिसते. स्वत: विजयराजे सिंधिया भिंडमधून, अटल बिहारी वाजपेयी ग्वालियरमधून तर विजयराजेंचे सुपुत्र आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील माधवराव सिंधिया गुणा येथून खासदार बनले.

बातम्या आणखी आहेत...