Shravan / ज्योतिर्लिंग : श्रावणातील पहिल्या दिवशी त्र्यंबकेश्वर, महाकालेश्वर, काशी विश्वनाथ आणि ओंकारेश्वरचे थेट दर्शन

श्रावणात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे आहे विशेष महत्त्व

रिलिजन डेस्क

Aug 02,2019 10:42:36 AM IST

आजपासून श्रावण मास सुरु झाला आहे. श्रावण महिन्यातील पहिल्या दिवशी दिव्यमराठी.कॉम तुमच्यासाठी घेऊन आले आहे देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 4 ज्योतिर्लिंगाचे थेट दर्शन. मध्यप्रदेशातील उज्जयन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, खंडवा येथील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रातील नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि वाराणसीलमधील काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन.


महाकालेश्वर
हे ज्योर्तिंलिंग मध्य प्रदेशाची धार्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणा-या उज्जैन शहरात वसलेले आहे. हे एकमेव दक्षिणमुखी ज्योर्तिंलिंग आहे. या मंदीरातील भस्म आरती जगप्रसिद्ध आहे. आयुष्य वाढावे आणि आयुष्यावर आलेले संकट टाळण्यासाठी महाकालेश्वराची विशेष पूजा केली जाते. उज्जैनचे नागरिक महाकालेश्वराला आपला राजा मानतात आणि महाकालेश्वरच आपली रक्षा करतो अशी त्याची श्रद्धा आहे.


ओंकारेश्वर
मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर हे ज्योर्तिंलिंग आहे. या ठिकाणी पर्वताच्या चहू बाजूंनी नर्मदा नदी वाहत असल्याने ओमचा (ॐ) आकार तयार झाला आहे. ॐ हे अक्षर पहिल्यादा ब्रह्मदेवाच्या मुखातून निघाले होते. म्हणुन कुठल्याही मत्रांची सुरुवात ॐ नेच होते. हे ज्योर्तिंलिंग ओमच्या आकाराचे असल्यामुळे हे ओंकारेश्वरनावाने ओळखले जाते.


काशी विश्वनाथ
ज्योर्तिंलिंगांपैकी एक असणारे काशी विश्वनाथ ज्योर्तिंलिंग उत्तर प्रदेशातील काशी (वाराणसी) येथे आहे. काशी विश्वनाथ चार धामांपैकी एक धामही आहे. काशीचे महत्व इतर सर्व तीर्थ स्थळांच्या तुलनेने अधिक आहे. जगात महाप्रलय आला तर महादेव काशीला आपल्या त्रिशुळावर उचलेले आणि प्रलय संपल्यावर परत ठेवेल,अशी आख्यायिका आहे.


त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीजवळ आहे. या गोदावरी नदीजवळ असणार्‍या ब्रह्मगिरी पर्वतातून गोदावरी नदी उगम पावते. महादेवाचे एक नाव त्र्यंबकेश्वर आहे. असे सांगितले जाते,की गौतम ऋषी आणि गोदावरी नदीच्या आग्रहास्तव महादेव येथे ज्योर्तिंलिंगाच्या प्रकट झाले होते.

X
COMMENT