आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो तीच त्या व्यक्तीची नाम राशी असते. यालाच चंद्र राशी असेही म्हणतात. चंद्र राशीनुसार सर्व 12 राशींसाठी वेगवेगळे नाम अक्षर सांगण्यात आले आहे. नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीची रास आणि त्याच्या भविष्य, स्वभावाविषयी समजू शकते. सर्व लोकांचे भविष्य आणि नेचर वेगवेगळे असते परंतु काही राशी इतर राशींपेक्षा जास्त बलशाली आणि भाग्यशाली असतात. येथे जाणून घ्या, सर्वात खास 4 राशींविषयी....
ही राशीचक्रातील पहिली रास आहे. या राशीचा स्वामी मंगळ असून हा ग्रहांचा सेनापती आहे. यामुळे मेष राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व क्षमता अद्भूत असते. या क्षमतेमुळे हे लोक इतर राशींपेक्षा जास्त ताकदवान राहतात. मंगळ ग्रह यांना मदत करतो. हे लोक कष्ट आणि नेतृत्व क्षमतेमुळे यशस्वी आणि भाग्यशाली होतात.
मेष राशीप्रमाणे वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळामुळे या राशीचे लोक धाडसी असतात. या राशीचे लोक कोणत्याही कामामध्ये रिस्क घेण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. आपले काम प्रामाणिकपणे करत राहतात. कष्टाच्या जोरावर इतर राशींपेक्षा जास्त ताकदवान बनतात. हे लोक उत्तम योजनाकार असतात. आपल्या योजनांमध्ये यशस्वी होतात.
नऊ ग्रहांमध्ये शनीचे स्थान सर्वात वेगळे आहे. हा ग्रहांचा न्यायाधीश आहे. मकर राशीचा स्वामी शनी आहे. यामुळे मकर राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहते. या राशीचे लोक आत्मविश्वासाने भरलेले राहतात. शनिदेव यांना उत्तम नेतृत्व क्षमता प्रदान करतात. अथक परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे प्रत्येक कामात यशस्वी होतात.
ही राशीचक्रातील अकरावी राशी आहे. या राशीचा स्वामीसुद्धा शनी आहे. शनिदेवाला कर्मफळ दाता म्हणतात म्हणजेच हा ग्रह आपल्या कर्माचे फळ आपल्याला देतो. कुंभ राशीच्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केल्यास शनिदेव यांना खूप मदत करतात आणि उच्च शिखरावर घेऊन जातात. या राशीचे लोक जास्त विचार करतात आणि योग्य योजना बनवतात. हे बुद्धिमान असण्यासोबतच परिस्थितीशी योग्यप्रमाणे जुळूवुन घेतात. यामुळे हे इतर राशीपेक्षा जास्त बलशाली बनतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.