Worship / अडचणींपासून दूर राहण्यासाठी जवळ ठेवू शकता पुजेमधील या गोष्टी 

शास्त्रानुसार कोणत्याही कामाच्या सुरुवातीला श्रीगणेशाची पूजा केल्याने काम निर्विघ्नपणे पार पडते.

रिलिजन डेस्क

Jul 06,2019 12:05:00 AM IST

पूजेमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू पूजा झाल्यानंतर तिजोरीत किंवा स्वतःच्या पाकिटात ठेवल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो. शास्त्रानुसार कोणत्याही कामाच्या सुरुवातीला श्रीगणेशाची पूजा केल्याने काम निर्विघ्नपणे पार पडते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार घरामध्ये नियमितपणे श्रीगणेशाची पूजा करावी. गणेश पूजेमध्ये विविध गोष्टी ठेवल्या जातात. यामध्ये काही खास गोष्टी पूजेनंतर घरात किंवा पाकिटात ठेवल्यास श्रीगणेशाची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत या गोष्टी...


1. प्रथम पूज्य श्रीगणेशाच्या पूजेमध्ये हळकुंड अवश्य ठेवावे. पूजा झाल्यानंतर हे हळकुंड तिजोरीत किंवा पाकिटात ठेवल्यास बरकत कायम राहते.


2. पूजेमध्ये ठेवण्यात येणाऱ्या सुपारीला श्रीगणेशाचे प्रतीक मानले जाते. यामुळे पूजा झाल्यानंतर श्रीगणेशाचे हे स्वरूपही तिजोरी किंवा पाकिटात ठेवावे.


3. श्रीगणेशाच्या पूजेमध्ये लाल धागा म्हणजेच मौली ठेवली जाते. पूजा झाल्यानंतर हा धागा धन स्थानावर ठेवू शकता. तुमची इच्छा असल्यास हा धागा मनगटावर बांधू शकता.


4. श्रीगणेशाच्या पूजेमध्ये तांदुळाचे विशेष महत्त्व आहे. पूजा झाल्यानंतर हे तांदूळ एकत्र करून लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावेत.


5. पूजेमध्ये देवाला धनही अर्पण केले जाते. पूजेमध्ये ठेवण्यात आलेले नाणे तिजोरीत ठेवल्यास महालक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते.

X
COMMENT