आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमितपणे हे 7 काम करणाऱ्या व्यक्तीला मिळू शकते नशिबाची साथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीला खूप कष्ट करूनही नशिबाची साथ मिळत नसेल किंवा कामामध्ये बाधा निर्माण होत असल्यास ज्योतिषमध्ये सांगण्यात आलेले उपाय केल्याने लाभ होऊ शकतो. कुंडलीतील दोषामुळे अशाप्रकारच्या अडचणी निर्माण होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, 7 उपाय जे नियमितपणे करत राहिल्यास नशिबाची साथ मिळू शकते. पैशाची कमी दूर होऊन पाकिटात पैसा टिकून राहतो.

  • पहिला उपाय

रोज सकाळी सर्व तीर्थ आणि पवित्र नद्यांचे स्मरण करत स्नान करावे. यामुळे सर्व तीर्थ स्नानांचे पुण्य मिळते. दुर्भाग्य नष्ट होते. शक्य असल्यास स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे. 

  • दुसरा उपाय

रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. तुळशीजवळची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. या उपायाने श्रीविष्णू-लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते.

  • तिसरा उपाय

रोज सकाळी लवकर उठावे. झोपेतून उठल्यानंतर लगेच दोन्ही हातांचे दर्शन घेऊन कुलदेवतेचे स्मरण करावे.

  • चौथा उपाय

सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला तांब्याच्या कलशाने जल अर्पण करावे. यामुळे मान-सन्मान प्राप्त होईल.

  • पाचवा उपाय

देवघरात सकाळ-संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा. कापूर जाळावा. देवघराजवळ नेहमी स्वच्छता राहील याकडे विशेष लक्ष द्यावे.

  • सहावा उपाय

घराबाहेर पडताना दही किंवा काही गोड खाऊन बाहेर पडावे. हा शुभ शकुन आहे आणि यामुळे यश प्राप्त होण्याची शक्यता वाढते.

  • सातवा उपाय

ज्योतिषमध्ये शनीला न्यायाधीश मानण्यात आले आहे. या ग्रहाचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी शनिवारी एका वाटीमध्ये तेल घेऊन त्यामध्ये स्वतःचा चेहरा पाहावा. त्यानंतर हे तेल दान करावे.

बातम्या आणखी आहेत...