आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे तपासलंत...?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घर खरेदी हा भावनिक विषय असला तरी काही व्यावहारिक गोष्टींबद्दल दक्ष राहायलाच हवं. कायदेशीर बाजूंचीही माहिती करून घ्यायला हवी. नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा वेळीच लक्ष घालून काही गोष्टी समजून घ्यायला हव्यातच. त्या गोष्टी नक्की कोणत्या ते सांगणारा हा लेख. यात उल्लेखलेल्या मूलभूत गोष्टींच्या स्पष्टतेशिवाय मालमत्ता खरेदी करू नका. 

 

मुद्रांक शुल्क :

नोंदणी मूल्याच्या काही टक्के रक्कम सरकारला जमा करावी लागते. त्याला मुद्रांक शुल्क अथवा स्टँप ड्यूटी म्हणतात. ही रक्कम विक्री मूल्याच्या ५ ते १४ टक्क्यांपर्यंत असू शकते.

 

खरेदी खत :

स्थावर मालमत्तेचा मूळ मालक ठराविक रकमेच्या मोबदल्यात खरेदीदाराला मालमत्तेचा पूर्ण अधिकार देतो. मालमत्ता हस्तांतरित करतो त्या कराराला खरेदी खत अर्थात सेल्स डीड म्हणतात.


करार नोंदणी :

मालमत्तेचा मालक आणि खरेदीदार यांच्यात जो करार होतो त्याची इंडियन रजिस्ट्रेशन अॅक्टखाली नोंदणी करणे आवश्यक असते. ही नोंदणी करण्यासाठी शुल्क आकारले जाते. 


गहाणखत :

बँँकेकडून कर्ज काढून मालमत्ता खरेदी केली जाते. अशा वेळी कर्ज पूर्ण फिटेपर्यंत घराचा ताबा बँकेकडे असतो. त्या कराराला गहाणखत म्हणतात.


मालकीपत्र : विकत घेतलेली मालमत्ता राहण्यास योग्य आहे असं प्रमाणपत्र बिल्डर-विक्रेत्याकडून खेरदीदारास दिलं जातं. हे दिल्याशिवाय संबंधित मालमत्तेचा ताबा मिळत नाही. त्याला मालकीपत्र म्हणतात. ऑक्युपेशन-कम्प्लिशन सर्टिफिकेट संबंधित मालमत्तेच्या मूळ मालकाला हे महानगरपालिकेकडून मिळते. सदर मालमत्ता राहण्यास योग्य आहे याची शहानिशा केल्यानंतर हे प्रमाणपत्र महानगरपालिका देते. मालमत्तेच्या पुनर्विक्रीच्या वेळी बँकेला हे प्रमाणपत्र अत्यावश्यक असतं. त्यामुळे हे प्रमाणपत्र मूळ मालकाकडून कटाक्षानं मिळवावं.
मालमत्ता आराखडा : संबंधित महानगरपालिकेनं प्रत्येक मालमत्तेचा आराखडा निश्चित केलेला असतो. घर खरेदीपूर्वी हा आराखडा तपासणे गरजेचे असते. 


कार्पेट एरिया :

मालमत्तेच्या जेवढ्या जागेचा वापर आपण प्रत्यक्ष राहण्यासाठी करतो त्या जागेला कार्पेट एरिया म्हणतात.
बिल्टअप एरिया : संपूर्ण बांधकामासह मोजली जाणारी जागा म्हणजे बिल्टअप एरिया. हा कार्पेट एरियापेक्षा दहा ते पंधरा टक्के जास्त असतो.


सुपर बिल्टअप एरिया :

बिल्टअप एरियासह जिना, लिफ्ट वगैरेसाठी वापरण्यात आलेली जागा म्हणजे सुपर बिल्टअप एरिया. बरेचसे बिल्डर मालमत्ता ही सुपर बिल्टअप एरियाच्या आधारे विकतात, मात्र कागदपत्रांवर कार्पेट एरियाचीच नोंद असते.

बातम्या आणखी आहेत...