आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळभैरव अष्टमी 19 नोव्हेंबरला, पुराणांमध्ये सांगण्यात आले आहेत 8 भैरव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचांगानुसार, कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला काळभैरव अष्टमी साजरी केली जाते. या दिवशी काळभैरवाची विशेष पूजा केली जाते. यावर्षी काळभैरव अष्टमी 19 नोव्हेंबरला साजरी केली जाईल. शिवपुराणानुसार काळभैरव महादेवाचे रौद्र रूप आहे. बह्मवैवर्त पुराणानुसार काळभैरव श्रीकृष्णाच्या उजव्या डोळ्यातून प्रकट झाले होते, जे आठ भैरवांपैकी एक होते. काळभैरव रोग, भय, संकट आणि दुःखचे स्वामी मानले गेले आहेत. यांची पूजा केल्याने स्वप्रकाराच्या मानसिक आणि शारीरिक अडचणी दूर होतात.

  • पुराणांमध्ये सांगण्यात आले आहेत 8 भैरव

स्कंद पुराणाच्या अवंती खंडानुसार, भगवान भैरवाचे 8 रूप आहेत. यामधील काळभैरव तिसरे रूप आहे. शिव पुराणानुसार संध्याकाळच्या वेळी जेव्हा रात्रीचे आगमन आणि दिवस समाप्त होतो, तेव्हा प्रदोष काळात महादेवाच्या रौद्र रूपातून भैरव प्रकट झाले होते. भैरवापासूनच इतर 7 भैरव प्रकट झाले असून यांना कर्म आणि रुपानुसार नाव देण्यात आले. रुरुभैरव संहारभैरव कालभैरव असितभैरव क्रोधभैरव भीषणभैरव महाभैरव खटवांगभैरव

  • काळभैरव

भैरवाचा अर्थ भय हरण करणारा किंवा भयावर विजय प्राप्त करणारा. यामुळे काळभैरवाची पूजा केल्याने मृत्यू आणि इतर सर्वप्रकाराच्या संकटाचे भय दूर होते. नारद पुराणानुसार काळभैरवाची पूजा केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. रोग, आजार, दुःख दूर होतात. काळभैरव महादेवाच्या प्रमुख गणांपैकी एक आहेत.

बातम्या आणखी आहेत...