आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डीत करिअर घडवण्याच्या अटीवर केले लग्न; गंभीर दुखापत झाल्याने मैदानात न उतरता पंचगिरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद - जिद्द अाणि प्रचंड मेहनतीची तयारी असली तर सातत्याच्या संघर्षानंतरही अापला छंद सहजपणे जाेपासता येताे याचाच प्रत्यय महाराष्ट्राच्या कबड्डीच्या अांतरराष्ट्रीय महिला पंच अारती बारी यांनी अाणून दिला. माेठ्या धाडसाने त्यांनी बालपणापासून जपलेला कबड्डीचा अापला छंद अविरतपणे जाेपासला. याच बाेलीवर त्या बाेहल्यावरही चढला. पतीसह सासऱ्यांच्या माेठ्या पाठबळामुळे त्यांना यातील अापले करिअर कायम ठेवता अाले. मात्र, सुदैवाने भीषण अपघाताने त्याच्या मैदानावरील खेळण्याला अडसर निर्माण झाला. यातून त्यांनी अापली जिद्द साेडली नाही. खेळण्यापेक्षा पंचगिरीच्या माध्यमातून त्यांनी कबड्डीशी जुळलेली अापली नाळ कायम ठेवली. यातून अाजच्या घडीला त्यांनी प्राे कबड्डी लीगच्या सहाव्या सत्रात पंचाची भूमिका बजावण्याची माेठी संधी मिळवली. त्या लीगच्या सलग सहाव्या सत्रात पंच म्हणून सहभागी झाल्या अाहेत. मुंबई उपनगरमधील अारतीला शालेय स्तरापासून कबड्डीची अावड निर्माण झाली. यातच करिअर करण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यासाठी त्यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धेतही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. 


पतीसह सासू-सासऱ्यांचे माेठे पाठबळ : कबड्डीचे मैदान गाजवत असतानाच अारती यांचे लग्न करण्यासाठी घरच्यांनी हालचाली सुरू केल्या. सुरुवातीला त्यांनी काहीसा नकार दर्शवला. 
मात्र, कबड्डीमधील अापले करिअर कायम ठेवण्याच्या अटीवरच त्यांनी यांच्यासाेबत संसार थाटण्याच्या निर्णय घेतला. यासाठी अजय बारी यांनीही ही अट पूर्ण करण्याचा शब्द दिला. अाज हाच शब्द पाळत पती अजय यांच्यासह अाई-वडीलही (सासू-सासरे) त्यांच्या याच छंदाला जाेपासण्यासाठी पाठबळ देतात. त्यामुळे त्यांना अातापर्यंत प्राे लीगच्या सहा व अनेक अांतरराष्ट्रीय दाैऱ्यात पंचांची भूमिका यशस्वीपणे पार पाडली. 

 

दाेन्ही हात-पायात राॅड 
कबड्डीमधील अापली प्रतिभा उंचावत एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अारती यांनी अल्पावधीमध्ये नवीन अाेळख मिळवली. दरम्यान खेळत असताना अारतीला अनेक दुखापती झाल्या. यामुळे त्यांच्या दाेन्ही हात अाणि पायात राॅड टाकावे लागले. मात्र, तरीही त्यांनी अापला छंद कायम ठेवला हाेता. 


पंचगिरीत नवी अाेळख 
अारती यांचे २००३ मध्ये लग्न झाले. तिचे खेळणेही कायम हाेते. मात्र,२००९ मध्ये तिच्या बाइकला भीषण अपघात झाला. याच अपघातात तिच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. वैद्यकीय तज्ज्ञांनी गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले. याशिवाय कबड्डी साेडण्याचा सल्ला दिला. मात्र, याचा सर्वात माेठा धक्का अारतीला बसला. तरीही त्यांनी धीर न सोडता थेट पंचगिरी करण्याला सुरुवात केली. यातून त्यांना अाता चार अांतरराष्ट्रीय स्पर्धेसह प्राे लीगच्या सहा सत्रात भूमिका पार पाडता अाली. 


करिअरची संधी 

महाराष्ट्रातील प्रतिभावंत युवा महिला खेळाडूंचे करिअर उज्वल अाहे. कबड्डीपटू म्हणून त्यांना अापली अाेळख निर्माण करता येईल. पंच म्हणून ही करिअरची संधी अाहे. त्यामुळे महिलांनी करियर म्हणून निवड करावी. -अारती बारी, पंच, मुंबई 


अांतरराष्ट्रीय स्तरावरील पंचगिरीत अशी केली कामगिरी 
२०१६ मध्ये कबड्डी विश्वचषक स्पर्धा : अहमदाबाद 
२०१८ मध्ये कबड्डी मास्टर्स स्पर्धा : दुबई 
२०१७ मध्ये एशियन चॅम्पियन शिप : इराण 
२०१८ मध्ये खेलाे इंडिया स्कूल गेम्स : दिल्ली 

 

बातम्या आणखी आहेत...