Home | Gossip | Kabhi Khushi Kabhie Gham Actress Malvika Raj Unseen Pics With Sanjay Dutt

संजय दत्तच्या कडेवर असलेल्या या चिमुकलीचे शाहरुख खानसोबत आहे एक खास कनेक्शन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 11:06 AM IST

अभिनेता संजय दत्तचा एक जुना फोटो समोर आला आहे, यामध्ये त्याच्या कडेवर एक चिमुकली दिसत आहे.

 • Kabhi Khushi Kabhie Gham Actress Malvika Raj Unseen Pics With Sanjay Dutt

  मुंबईः अभिनेता संजय दत्तचा एक जुना फोटो समोर आला आहे, यामध्ये त्याच्या कडेवर एक चिमुकली दिसत आहे. या मुलीला तुम्ही कदाचित ओळखले नसेल, पण ही मुलगी आज बॉलिवूड अभिनेत्री बनली असून तिचे शाहरुख खान आणि करीना कपूरसोबतही एक खास कनेक्शन आहे. हे छायाचित्र 1994 मध्ये रिलीज झालेल्या 'जमाने से क्या डरना' या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरचे आहे.

  या मुलीचे वडील बॉबी राज चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यामुळे ही चिमुकली तिच्या वडिलांसोबत सेटवर उपस्थित होती. शूटिंगच्या फावल्या वेळेत संजय दत्त या चिमुकलीसोबत खेळायचा आणि त्याचकाळात हे छायाचित्र क्लिक झाले आहे. आता ही चिमुकली 24 वर्षांची झाली असून तिने शाहरुख खानच्या ऑनस्क्रिन मेव्हणीची भूमिका चित्रपटात साकारली होती. 'कभी खुशी कभी गम'मध्ये शाहरुख खानची मेव्हणी आणि करीना कपूरच्या बालपणीची भूमिका साकारणा-या या अभिनेत्रीचे नाव आहे मालविका राज. मालविकाने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  300 मुलींमधून चित्रपटासाठी सिलेक्ट झाली होती मालविका...
  मालविकाने सांगितल्यानुसार, 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात करीनाच्या बालपणीची भूमिका साकारण्यासाठी मला 300 मुलींमधून सिलेक्ट करण्यात आले होते. ''मी शाळेत टॉम बॉय होती. फुटबॉल खेळाची आणि मुलांना हरवायची. कऱण जोहरचे असिस्टंट डायरेक्टर सोहम यांनी मला बघितले आणि माझ्या शिक्षिकेला माझ्याविषयी विचारले. त्यांनी मला माझा फोन नंबर मागितला. मी त्यांना फोन नंबर का हवा? असे विचारले असता, त्यांनी प्रिन्सिपलला हवा आहे, असे सांगितले. मला वाटले की, प्रिन्सिपल मला शाळेतून काढून टाकणार. पण सोहम यांनी माझ्या आईला फोन केला आणि 'कभी खुशी कभी गम' मध्ये करीनाच्या बालपणीची भूमिका मालविकाने साकारावी असे सांगितले. करण आणि यश अंकल माझ्या वडील, आजोबांसह सगळ्यांना ओळखत होते. सुरुवातीला माझे वडील होकार देत नव्हते. कारण मी पहिले शिक्षण पूर्ण करावे, असे त्यांना वाटत होते. पण यश अंकल यांनी मला ऑडिशनसाठी फोन केला असता, माझ्या वडिलांनी मला परवानगी दिली."

  अॅक्ट्रेस अनीता राजची भाची आहे मालविका...
  मालविका ही गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री अनीता राजची भाची आहे. अनीताने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'प्रेमगीत' (1981), 'लैला' (1984), 'जान की बाजी' (1985), 'मेरा हक' (1986), 'प्यार किया है प्यार करेंगे' (1986), 'हवालात' (1987), 'क्लर्क' (1989), 'नफरत की आंधी' (1989), 'विद्रोही' (1992), 'अधर्म' (1992) हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत.

  इमरान हाश्मीसोबत झळकणार मालविका...
  18 सप्टेंबर 1993 रोजी जन्मलेल्या मालविकाने 2017 मध्ये दिग्दर्शक जयंत सी. परंजी यांच्या 'जयदेव' या तेलुगु चित्रपटातून अभिनेत्री म्हणून डेब्यू केले होते. चित्रपटात तिच्यासोबत आंध्र प्रदेशातील नेते गंता श्रीनिवासा राव यांचा मुलगा गंता रवी होता. मालविका लवकरच सीरियल किसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इमरान हाश्मीसोबत 'कॅप्टन नवाब'मध्ये झळकणार आहे. टोनी डिसूजा दिग्दर्शित या चित्रपटात मालविका, इमरानच्या प्रेयसीच्या भूमिकेत असेल.

Trending