आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kabus Had Become The Sultan By The Turning Of His Father Power; The Angry Father Pulled The Pistol

वडिलांचे तख्तपालट करून सुलतान बनले होते काबूस; संतापलेल्या वडिलांनी पिस्तूल ताणले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मस्कत : ओमानचे सुलतान काबूस बिन सईदचे शुक्रवारी निधन झाले. ७९ वर्षीय काबूस अरब जगतातील सर्वाधिक काळ शासन करणारे सुलतान आहेत. त्यांनी सुमारे ५० वर्षे शासन केले. ते गेल्या महिन्यात बेल्जियम येथून कर्कराेगावर उपचार करून मायदेशी परतले हाेते. ते अविवाहित हाेते.

१९७० पूर्वी ओमानवर काबूस बिन सईदचे वडील सुलतान सईद बिन तैमूरचे शासन हाेते. वय वाढल्यानंतर ते आजारी व मानसिक पातळीवर कमकुवत झाले हाेते. परंतु राजगादी साेडण्यास तयार नव्हते. ओमान त्या काळात मागासलेल्या स्थितीत हाेता. सुलतान काबूसने १९७० मध्ये ब्रिटनचा पाठिंबा घेत वडिलांना गादीवरून हटवले आणि स्वत: गादीवर बसले हाेते.

ब्रिटनने काबूस बिन सईदच्या उत्तराधिकाऱ्यास समर्थन दिले. सुलतान सईद बिन तैमूर यांना राजगादी साेडण्यास सांगितले. त्यावर ते प्रचंड संतापले. त्यांनी आपली पिस्तूल काढला. पिस्तूल काढतेेवेळी चुकीने गाेळी झाडली गेली. ही गाेळी पायांना लागली आणि पायाला माेठी जखम झाली. त्यानंतर उपचारासाठी ते लंडनला निघून गेले. दाेन वर्षांनंतर त्यांचा मृत्यू झाला.

लिफाफ्यात उत्तराधिकाऱ्याचे नाव, चुलत भाऊ हॅथम झाले सुलतान

ओमानच्या संविधानानुसार शाही परिवाराला नवा शासक निवडण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली जाते, परंतु या काळात निर्णय हाेेऊ शकला नाही तर कुटुंबाच्या नावाने सुलतानने पत्राद्वारे सुचवलेल्या व्यक्तीला नवीन सुलतान म्हणून जबाबदारी साेपवली जाते. काबूसने बंद लिफाफ्यात आपले उत्तराधिकारी म्हणून हॅथम बिन सईदच्या नावाची शिफारस केली हाेती.

वडिलांनी ओमानमध्ये रेडिओ, गाॅगल वापरावर लावली हाेती बंदी

काबूस बिन सईद सुलतान बनले. तेव्हा ओमान अतिशय मागास हाेता. संपूर्ण देशात केवळ १० किलाेमीटर पक्के रस्ते व केवळ तीन शाळा हाेत्या. त्यांचे वडील प्रचंड रुढीवादी हाेते. त्यांनी रेडिओ ऐकणे व उन्हापासून सुरक्षेसाठी गाॅगल वापरण्यास बंदी घातली हाेती. काेण विवाह करणार, काेण शिक्षण घेऊ शकते, काेणी देश साेडावा,याचा निर्णयही ते घेत. ब्रिटनमध्ये शिकलेल्या काबूल बिन सईद यांनी सूत्रे घेताच ओमनची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू झाली. तेल, गॅसचा साठा करून कमाई करण्यात आली. ओमानचा त्यातून कायापालट झाला. आता ओमानमध्ये ६२ हजार २४० पक्के रस्ते आहेत. १५०० हून जास्त सरकारी विद्यालये आहेत.