आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या कारवर झालेल्या गोळीबारप्रकरणी चौघांना दोषी धरण्यात आले आहे. जेऊरचे महांतेश पाटील याच्यासह चौघांचा समावेश आहे. सोमवारी अतिरिक्त न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील महांतेश पाटील, दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील बाप्पा उर्फ शरणाप्पा दिंडोरे, शिवराया बाके व चंद्रकांत माळी या चौघांना दोषी धरले आहे. ३० जून २०१२ रोजी हत्तुरे वस्ती येथील कुमठा क्रॉस येथे गोळीबार झाला होता. ती गोळी कारच्या पाठीमागील काचेला चाटून गेली होती. याबाबत विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली होती. तपासात चौघांची नावे समोर आली होती. पाटील याने दिंडोरे, बाके व माळी यांच्या समावेत खुनाचा कट रचला होता.
मंगळवारी न्यायालयाने चौघांना दोषी धरले असून, येत्या सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सरकारतर्फे आनंद कुर्डुकर, फिर्यादीतर्फे जयदीप माने, आरोपीतर्फे मधुकर देवडकर, एम. जी. थोरात या वकीलांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.