आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kader Khan Death : Son Claims Most Of Bollywood Celebs Did Not Even Called Once.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडवर भडकला कादर खानचा मुलगा, म्हणाला - निधनानंतर फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांनी फोनही केला नाही, म्हणाला - शेवटच्या वेदनादायी दिवसांमध्ये एका अॅक्टरची नेहमी आठवण काढायचे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. जेष्ठ अभिनेते आणि कॉमेडियन कादर खान यांचे 31 डिसेंबरला कनाडामध्ये निधन झाले आहे. 2 जानेवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांच्या निधनानंतर कादर खान यांचा मुलगा सरफराजने मीडियासोबत बातचित केली. यावेळी सरफराजने सांगितले की, जेव्हा त्याचे वडील तिन्ही मुलांसोबत कनाडाला निघून गेले तर इंडस्ट्रीने कशा प्रकारे त्यांच्यावर दुर्लक्ष केले. सरफराज म्हणाला - "हे खुप दुःखद आहे की, कनाडामध्ये वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर इंडस्ट्रीतील जास्तीत जास्त लोकांनी फोन करण्याचीही तसदी दाखवली नाही. इंडस्ट्रीमधील अनेक लोक हे अब्बाच्या खुप जवळचे होते. पण अब्बांना अमिताभ बच्चन सर्वांत जास्त आवडायचे. मी अब्बांना विचारायचो की, ते इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त मिस कुणाला करतात, तर त्यांचे उत्तर अमिताभ बच्चन असायचे. मला माहित होते की हे म्यूच्यूअल प्रेम होते. माझ्या अब्बांना शेवटच्या श्वासापर्यंत अमिताभ यांची आठवण काढली हे त्यांना कळावे असे मला वाटते."

 

गोविंदाच्या वक्तव्यावर भडकला सरफराज
80 आणि 90 च्या दशकात कादर खान डायरेक्टर डेविड धवन, अॅक्टर गोविंदा आणि शक्ती कपूरच्या खुप जवळचे होते. कादर खानच्या मृत्यूनंतर गोविंदा म्हणाला की, तो कादर खान यांना वडिलांप्रमाणे मानायचा. सरफराजला गोविंदाच्या वक्तव्यावर रिअॅक्शन मागितली तेव्हा तो भडकला. तो म्हणाला, "कृपया गोविंदाला विचारा की, त्यांनी वडिलांसमान असणा-या व्यक्तीच्या तब्येतीची किती विचारपूस केली? आपली फिल्म इंडस्ट्री आता अशी झाले आहे की, जे जेष्ठ अॅक्टर्स आपले अमूल्य योगदान दिल्यानंतर काही काळासाठी दूर गेले. तर त्यांचा सर्वांना विसर पडतो. मोठे स्टार्स इन रिटायर झालेल्या अॅक्टरर्ससोबत फोटो काढताना दिसत असतात. पण हे प्रेम फक्त फोटोमध्येच राहते. यापेक्षा जास्त काही नसते. ललिता पवारजी आणि मोहन चोटीजीची आठवण काढा, किती वाईट परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला. नशीबाने माझ्या वडिलांचे तीन मुलं होते, त्यांची काळजी सर्वांनी घेतली. पण जे लोक आर्थिक आणि इमोशनल सपोर्ट शिवाय गेले त्यांचे काय"

 

खुप वेदनादायी होते कादर खान यांचे शेवटचे वर्षे 
- सरफराजने सांगितले, "माझ्या अब्बाचे शेवटचे वर्ष खुप वेदनादायी होते. ते  Degenerative Disease चा सामना करत होते, यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हते. येथे टोरंटोमध्ये त्यांना सर्वात चांगले उपचार मिळाले. माझ्या अब्बाने हिंदी सिनेमामध्ये खुप मोठे योगदान दिले आहे आणि पुर्ण जगासोबतच त्यांच्या चाहत्यांना आश्वस्त करतो की, आम्ही इंडस्ट्रीला त्यांना विसरु देणार नाही."