आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठुअा बालिका हत्या प्रकरण :पीडितेच्या कुटुंबाने वकिलास हटवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पठाणकाेट -  जम्मू-काश्मीरच्या कठुआत गेल्या जानेवारीत अाठवर्षीय बालिकेवर बलात्कार करून हत्या केल्या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी अॅड. दीपिका राजावत यांना वकील म्हणून हटवले. या प्रकरणी  अातापर्यंतच्या सुनावणीत त्या क्वचितच उपस्थित राहिल्याचे कारण त्यांनी दिल आहे.


या प्रकरणाच्या सुनावणीवेळी पीडितेच्या वडिलांना अॅड. मुबीन फारुकी यांनी न्यायालयात हजर केले हाेते. त्यात त्यांनी अॅड. राजावत या गत पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाच्या सुनावणीला फारच कमी वेळा उपस्थित राहिल्याचे सांगून त्यांना हटवण्यात यावे, असे न्यायालयाला सांगितले. दरम्यान, कठुअात गत १० जानेवारी राेजी संबंधित बालिकेचे अपहरण करण्यात अाले हाेते. त्यानंतर बलात्कार करून तिची हत्या केली हाेती. घटनेनंतर ७ दिवसांनी १७ जानेवारी राेजी तिचा चेहरा ठेचलेला मृतदेह अाढळून अाला हाेता. अाराेेपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात अाला हाेता. याप्रकरणी जम्मू-काश्मीरच्या गुन्हे शाखेने एका अल्पवयीन मुलासह अाठ जणांना अटक केली अाहे. 

 

न्यायालयाने अॅड. राजावत यांना बजावली नाेटीस  
याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून दाखल याचिकेवर बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात सुनावणी करण्यात अाली. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने  अॅड. राजावत यांना नोटीस बजावून २० नाेव्हेंबरपर्यंत पीडितेच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर उत्तर मागवले अाहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार दरराेज केली जात अाहे.

बातम्या आणखी आहेत...