आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kailas Mansarovar Journey | There Is No 79 Km Hike To Kailash Mansarovar, It Can Be Reached By Vehicle In 3 Days

कैलास मानसरोवरसाठी ७९ किमी पदयात्रा नाही, ३ दिवसांत वाहनाने पोहोचणे शक्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ६० किमींचे रस्ते तयार, ४ किमींचे उर्वरित काम वर्षअखेर पूर्ण होणार
  • मानसरोवरापर्यंत जाण्याचे तीन मार्ग, उत्तराखंडमार्गे पादचारी वाट बंद

मुकेश कौशिक / शरद पांडे

नवी दिल्ली - सर्वात दुर्गम कैलास मानसरोवर यात्रेचा उत्तराखंडमधून जाणारा मार्ग सुगम होणार आहे. येथे ७९ किमींचा पादचारी मार्ग होता. आता लवकरच वाहनाने  हा प्रवास तीन दिवसांत पूर्ण करता येईल. येथील रस्ते बांधणीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. प्रवासी अल्मोडा किंवा पिथोरगड मार्गे चीन सीमेजवळील लिपूलेख पर्यंत वाहनांनी जाऊ शकतील. घटियाबगर येथून लिपूलेख दरम्यान सुमारे ६० किमी लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. आता केवळ उर्वरित ४ किमी मार्गाच्या निर्मितीचे काम बाकी आहे. वर्षअखेरीस तेही पूर्णत्वास जाईल. कैलास मानसरोवर यात्रेसाठी रस्त्यांचे काम २००७ मध्ये घटियाबगर पासून सुरू झाले होते. २०१४ पर्यंत त्याच्या बांधकामाचा वेग मंद होता. काम वाढवण्यासाठी चीन सीमेजवळील गुंजीपासूनही रस्ता करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. परंतु, ती कठीण होती. कारण त्यात सर्वात मोठे आव्हान १४ हजार फूट उंचीवरील गुंजीपर्यंत उपकरणे घेऊन जाण्याचे होते. जेसीबी, बुलडोझर, रोड रोलर सारख्या उपकरणांचे सुटे भाग आधी गुंजीपर्यंत हेलिकॉप्टरने पोहोचवली. तेथे उपकरणांची पुन्हा बांधणी केली. 

मालपा ते बुधीपर्यंतचा मार्ग आणखी बाकी 

घटियाबगर ते लिपुलेख पर्यंतचा एकूण ६४ किमीचा मार्ग अजून बनवायचा आहे. त्यात मालपा ते बुधीपर्यंत ४ किमी बाकी आहे. डिसेंबरपासून एप्रिल २०२० पर्यंत बर्फवृष्टीमुळे काम बंद राहणार आहे. त्यानंतर काम पूर्ण केले जाणार आहे.  कुमाउं मंडल विकास निगमचे माजी पर्यटन अधिकारी व यात्रेच्या पहिल्या जत्थ्यात सहभागी विपिनचंद पांडेय म्हणाले, या मार्गे १९८१ मध्ये यात्रेला सुरुवात झाली होती. प्रवाशांना अत्यंत धोकादायक डोंगरातून जावे लागते. नवीन मार्गे सहा दिवस वाचू शकतात. आयटीबीपीच्या सातव्या बटालियन मिर्थी-उत्तराखंडचे कमांडंट अनुप्रीत बोरकर म्हणाले, नवीन मार्गाचा लाभ होणार आहे. कारण यात्रा मार्गावर ठिकठिकाणी व्यवस्था केलेली दिसते. अशा प्रकारे दैनिक भास्कर पोहोचला मानसरोवरला


एका बाजूने पर्वतांतून होणारे भूस्खलन आणि दुसरीकडे दरी. ३५ किमींचा दुर्गम प्रवास दैनिक भास्कर धारचूला ते मंगती नालापर्यंत पोहोचले. धारचूला ते मंगती नालापर्यंत रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. रस्त्यात अनेक ठिकाणी जेसीबीच्या मदतीने दगड, ढिगारे हटवणे, तर काही ठिकाणी दगड-मातीने खड्डे भरून रस्ते बनवले जात आहेत. अनेक ठिकाणी खराब रस्त्यावर वाहन फसले. त्याला जेसीबीच्या मदतीने बाहेर काढावे लागले. अशा प्रकारे दैनिक भास्कर कैलास मानसरोवर मोटरेबल ट्रॅकनेपर्यंत पोहोचला. कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान रस्ते दुरुस्त केले जातात. त्यामुळे यात्रेकरू सहजपणे पोहोचू शकतात. त्यानंतर रस्त्यावर ठिकठिकाणी ढिगारे पडलेले दिसून येतात. आजूबाजूच्या गावातील लोक किंवा आयटीबीपी व लष्करी जवान परिसरात दिसतात.उत्तराखंडमार्गे.. आतापर्यंत सहा दिवस लागायचे 


यात्रा उत्तराखंडच्या धारचुलापासून सुरू होते. येथून मंगती नाल्यापर्यंत ३५ किमी वाहनाने जावे लागते. पहिल्या दिवशी जिप्ता गाालापर्यंत ८ किमी पायी चालावे लागते.दुसऱ्या दिवशी २७ किमी चालून बुधी, तिसऱ्या दिवशी १७ किमी चालून गुंजीपर्यंत जावे लागते. येथे दोन रात्री मुक्काम. वैद्यकीय तपासणी व हवामान जाणून घेतले जाते. पाचव्या दिवशी १८ किमी चालून नबीडांग, सहा दिवशी ९ किमी चालून लिपूलेखमार्गे चीनला जावे लागते. एकूण पायी प्रवास ७० किमींचा आहे. नवा मार्ग...प्रवासासाठी यापुढे लागतील असे तीन दिवस
 
अाता धारचुलाहून पहिल्या दिवशी सहा तासांत बुधीला जाता येते. पुढील दिवशी ३ तासांत वाहनाने गुजीपर्यंत जाता येईल. दुसऱ्या रात्रीचा मुक्काम येथे करता येऊ शकतो. तेथे वैद्यकीय तपासणी होईल. तिसरा दिवस लिपूलेखमार्गे चीनला पोहोचता येईल. ८० किमी रस्ते मार्गे कुगूला पोहोचता येईल. तेथून मानसरोवरच्या दिशेने वाटचाल करता येईल. दिल्लीहून यात्रेला (२७०० किमी) सुरुवात करून परत येण्यास १६ दिवस लागतील. आधी २२ दिवस लागायचे. नेपाळमार्गे ...भारत-चीन याबाबत काहीही करार नाही 
 
नेपाळमार्गे देखील मानसरोवर यात्रेला जाता येऊ शकते. भारत व चीन सरकार यांच्या या यात्रामार्गाबाबत करार झालेला नाही. उत्तराखंड व सिक्किममार्गे केवळ भारतीय यात्रेकरू मानसरोवराला जातात. ही यात्रा काठमांडूहून सुरू होते. खासगी टूर ऑपरेटर आपल्या सुविधेनुसार मार्ग ठरवतात. काठमांडूहून मानसरोवरपर्यंतचा मार्ग ९०० किमी लांबीचा आहे.सिक्कीममार्गे...एकूण २७०० किमींचा प्रवास 
 


यात्रेकरून दिल्लीहून सिक्कीमची राजधानी गंगटोकला जातील. येथून ५५ किमींवर नाथूला खिंड आहे. नाथूलाहून चीनमध्ये प्रवेश केल्यानंतर नग्मा, लाजी, जोंग्बापर्यंतचा प्रवास छोट्या बसने करता येतो. जोंग्बाहून किनाऱ्यावरील कुगूपर्यंत जाता येते. म्हणजे दिल्लीहून २७०० किमींचा प्रवास करून परिक्रमा मार्गावर जाता येते. जाण्या-येण्यात २० दिवसांचा कालावधी लागतो.