आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील केशर आंबा, मोसंबी, पैठणीला जीआय मानांकन; महाराष्ट्र कृषी जीआयमध्ये अव्वल क्रमांक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- देशात एकूण ९२ पिकांना जीआय (भौगोलिक निर्देशांक) मानांकन मिळाले आहे. त्यापैकी राज्यातील एकूण २४ कृषी उत्पादने, हॅण्डीक्राप्ट ४ आणि प्रक्रिया मधील १ असे एकूण २९ उत्पादनांना जीआय मानांकन मिळून महाराष्ट्र कृषी जीआयमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. सर्वात अभिमानाचे म्हणजे मराठवाड्यातील केशर आंबा, मोसंबी, बालाघाटचे सीताफळ आणि पैठणीचा त्यात समावेश आहे. यामुळे उत्पादनाची स्वतंत्र ओळख बाजारपेठेत तयार होऊन अधिक भाव मिळेल. गेल्या दहा वर्षांत मानांकनाकडे कोणी गांभीर्याने पाहिले नव्हते. ही बाब लक्षात आल्यावर कृषी विभागाने त्यावर लक्ष केेंद्रीत केले. ही उत्पादने अशी. १) लासलगाव - कांदा, २) सिंधुदुर्ग, रत्नागिरी - कोकम, ३) वेंगुर्ला - काजू, ४) आजरा घनसाळ - तांदूळ, ५) नवापूर - तूर, ६) वाघ्या - घेवडा, ७) मंगळवेढा - ज्वारी, ८) बीड, बालाघाट - सीताफळ,९ ) जालना - मोसंबी, १०) सांगली - बेदाणा, ११) मराठवाडा - केशर आंबा, १२) पुरंदर - अंजीर, १३) भिवापूर - मिरची, १४) जळगाव - भरीत वांगे, १५) सोलापूर - डाळिंब,१६ ) आंबेमोहर तांदूळ, १७) कोल्हापूर - गुळ, १८) नाशिक - द्राक्ष, १९) महाबळेश्वर - स्ट्रॉबेरी, २० ) धनु घोलवड - चिक्कू, २१) जळगाव - केळी, २२) हापूस आंबा, २३) नागपूर - संत्री, २४) वाहेगाव - हळद 

 

हस्तकला १ ) सोलापूर - चादर, २) पैठण - पैठणी, ३) वारली पेंटिंग, ४) करवत काटी साडी. प्रोसेसिंग उत्पादन १) नाशिक - वाईन. 

 

अधिक किमतीस मदत 
शेतमालाला ओळख मिळते. अधिकृत ब्रँड तयार होतो. गुणवत्ता, दर्जाची शाश्वतता मिळून उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकते. अधिक किमत मिळण्यास मदत होते. 

यांना मिळणार जीआय देशात प्रसाद म्हणून तिरूपतीच्या लाडू प्रसादाला सर्वप्रथम जीआय मानांकन मिळाले आहे. सध्या माहुर गडावरील तांबूल तसेच कुंथलगिराच्या पेढ्याला मानांकनाचा प्रयत्न सुरू आहे. 

 

उत्पादनाची ओळख निर्माण करा 
माझ्या कार्यकाळात देशात महाराष्ट्रातील २६ उत्पादने जीआय मानांकनात पोहोचवल्याचा अभिमान वाटतो. शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे ब्रँडिंग, प्रोसेसिंग, पॅकिंगला महत्त्व देवून उत्पादनाची ओळख निर्माण करावी. त्यामुळे ग्राहक बाजारपेठेत त्याचा शोध घेत येतील. राज्य सरकारनेही सर्व जीआय मानांकन पिकांना विदेशात नोंदणीसाठी प्रयत्न करावेत. प्रा. गणेश हिंगमिरे, संचालक, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी पुणे. 

 

बातम्या आणखी आहेत...