आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्क : अभिनेत्री काजल अग्रवालने सिंगापुरच्या मॅडम तुसाद म्यूझियममध्ये बुधवारी आपल्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी तिचे आई वडील आणि बहिणदेखील तिथे उपस्थित होते. इव्हेंटसाठी काजल पर्पल रंगाचा सूट घालून पोहोचली होती. तसेच तिच्या पुतळ्याला सोनेरी रंगाचा चमचमता वन शोल्डर डिटेलिंग असलेला सिक्वीन गाऊन घातला गेला होता. काजलव्यतिरिक्त या म्यूझियममध्ये अनुष्का शर्मा, प्रभास, श्रीदेवी, महेश बाबू आणि करण जोहरचे पुतळे लागलेले आहेत.
इव्हेंटदरम्यान काजलने लंडनच्या मॅडम तुसाद म्यूझियममध्ये फिरण्याचा आपला अनुभव शेअर केला. ती म्हणाली, 'जेव्हा मी 12 वर्षांची होते, तेव्हा मी लंडनच्या मॅडम तुसाद म्यूझियममध्ये गेले होते आणि मला आठवते की, तेव्हा ताऱ्यांच्यामध्ये बसले होते. मी महात्मा गांधीजींच्या समोर हात ठेऊन फोटोज काढले होते. मी बीटल्ससोबत सोफ्यावर बसले होते आणि मला वाटत होते, 'ओह माय गॉड मी येथे आले आहे.' मला आठवते जेव्हा मी त्या सर्व लोकप्रिय लोकांना तिथे पहिले होते तेव्हा मला कळाले होते खरोखर लोकप्रिय, मनात जागा बनवणे आणि खूप प्रसिद्ध होण्याचा काय अर्थ असतो. मला माहित नव्हते की, एक दिवस मलाही स्वतःचा मेणाचा पुतळा येथे पाहायला मिळेल.'
Thank you @MTsSingapore for this wonderful recognition😊#MadameTussaudsSG #UltimateFilmStarExperience #KajalMadameTussauds #MadameTussaudsSingapore pic.twitter.com/9cKtjK4z2Y
— Kajal Aggarwal (@MsKajalAggarwal) February 5, 2020
पुढे काजलने हेदेखील सांगितले की, जेव्हा मॅडम तुसादच्या वतीने तिला पहिले अधिकृत पत्र मिळाले होते तेव्हा ती किती जास्त उत्साहित आणि भावनिक झाली होती. तिने सर्व श्रेय मेणाचा पुतळा बनवणाऱ्या टेक्निशियन्सला दिले. ती म्हणाली, 'त्यांनी एक असा पुतळा बनवला ज्यावर मला खरंच खूप गर्व आहे. टेक्निशियन्स उत्तम आहेत, जेवढे तास आणि मेहनतीने त्यांनी हा पुतळा बनवला, ते अगदी अद्भुत आहे.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.