आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Metoo प्रकरण सुरु असतानाच 'सिंघम'च्या अभिनेत्रीला या अॅक्टरने केले सर्वांसमोर Kiss

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंट डेस्क. जगभरात #Metoo कॅम्पेन चर्चेत आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या सेक्शुअल हरॅशमेंटविषयी बातचित केली. हे प्रकरणं समोर आल्यानंतर परिस्थिती सुधारेल असे वाटत होते. पण असे होताना दिसत नाहीये. हैदराबादमध्ये 'कवचम' चित्रपटाचा टीजर रिलीज होता. मंचावर चित्रपटाचे कलाकार उपस्थित होते. 'सिंघम'मध्ये अजय देवगणची हिरोइन राहिलेली काजल अग्रवालही तिथे होते. ती यावेळी बोलत होती. तिने आपला सहकलाकार नायडूचा परिचय दिला तेव्हा नायडूने तिला kiss केले. या घटनेने काजल चकीत झाली. तिला नायडूचे असे वागणे आवडले नाही हे तिच्या हावभावावरुन स्पष्ट होत होते. यानंतर ती म्हणाली की, ये चान्स पर डान्स कर गया. विशेष म्हणजे नायडूने यानंतर आपल्या वागण्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. नायडू म्हणाला की, 'तु फीमेल अॅक्टर मेहरीनला किस केले तर मी तुला केले.' यावर काजल म्हणाली की, 'चला काही हरकत नाही, नायडू माझ्या फॅमिलीसारखा आहे.' व्हिडिओमध्ये पहा संपुर्ण 

बातम्या आणखी आहेत...