शेतात वडिलांना मदत करत काजलने उजळवले मैदान; कुटुंबीयांसह गावकरीही मानतात मुलगा

एकनाथ पाठक

Apr 01,2019 09:39:00 AM IST

औरंगाबाद - प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या बळावर खाे-खाेपटू काजल भाेेर आणि प्रतीक वाईकरने आई-वडिलांच्या मेहनतीला साेनेरी यशाची चमक मिळवून दिली. त्यांनी वेळाेवेळी केलेल्या कष्टाचे चीज करत या दाेघांनीही ५२ वी राष्ट्रीय अजिंक्यपद खाे-खाे स्पर्धा गाजवली. प्रतिकूल परिस्थितीमध्ये माेठ्या धाडसाने आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करता या दाेन्ही प्रतिभावंत युवा खेळाडूंनी प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावले. या राष्ट्रीय स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर काजल आणि प्रतीकने सर्वांचे लक्ष वेधले. यातूनच काजलला प्रतिष्ठेचा राणी लक्ष्मीबाई आणि प्रतीकला एकलव्य पुरस्काराने गाैरवण्यात आले. त्यांनी महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.


मुलगी असुनही मिळवून दिली प्रतिष्ठा
पुणे जिल्ह्यातील रांजणी या छाेट्या गावातील काजल भाेरने आतापर्यंत १७ पेक्षा अधिक राष्ट्रीय खाे-खाे स्पर्धांत काैशल्य पणास लावले आहे. तुकाराम भाेर यांना सात मुली आहेत. सातवी मुलगी असलेल्या काजलने कर्तबगार मुलासारखी कामगिरी करत भाेर कुंटुबाला प्रतिष्ठा मिळवून दिली.त्यामुळे तिला कुंटुबिय व गावकरी मुलगा मानतात. काजलने सात वेळच्या चॅम्पियन महाराष्ट्राचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले. तिने २०१७, १८ आणि १९ मध्ये महाराष्ट्राला विजेेतेपद मिळवून देण्यात माेलाचे याेगदान दिले आहे. प्रतिभावंत आक्रमक खेळाडू म्हणून तिची ख्याती आहे. तिने १४ व्या वर्षी पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला. तिने अातापर्यंत १४ राष्ट्रीय व ३ ओपन नॅशनलमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले.

वडिलांच्या पाठबळाने पुन्हा मैदानावर परतली
एक एकर शेती आणि कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी वडील तुकाराम एकटेच कष्ट करत आहेत. खेळामुळे त्यांना मदत करता येत नाही, याची खंत काजलला हाेती. त्यामुळे तिने काही काळ खाे-खाे खेळणे बंद केले. मात्र, तिला वडिलांनी पाठबळ दिले आणि तिला पुन्हा नव्या उमेदीने मैदानावर परतण्याचे सांगितले. त्यानंतर तिने दमदार पुनरागमन करताना प्रतिष्ठेच्या राणी लक्ष्मीबाई पुरस्काराचा बहुमान पटकावला.

नाेकरी करून सातत्याने सरावाला पसंती
पुण्यामध्ये राहणाऱ्या प्रतीकला आई अलका वाईकर यांचे माेलाचे पाठबळ मिळाले. त्यामुळे त्याला आपला भाऊ राष्ट्रीय खाे-खाेपटू कुणालसारखेच करिअर करता आले. त्यांनी शिवणकाम करून आपल्या परिस्थितीवर मात केली आणि प्रतीकला खेळण्यासाठी प्राेत्साहन दिले. त्यामुळे त्याने १५ राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग नाेंदवला. आता हा मानाचा एकलव्य पुरस्कार जिंकला.

X
COMMENT