आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई तनुजासोबत दिवाळी शॉपिंगवर निघाली काजोल, तनुजाला बघून सोशल मीडिया यूजर्स म्हणाले - यांना कपड्यांनी नव्हे तर प्रोटीनची आहे गरज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री काजोल आणि तिची आई तनुजा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काजोलने अलीकडेच तिच्या आईसोबत जुहू येथे दिवाळीची शॉपिंग केली. शॉपिंगनंतर काजोल आईसोबत कारच्या दिशेने जाताना दिसतेय. यावेळी तिच्या हातात शॉपिंग बॅग्स असून तनुजा तिच्या मागे दिसत आहेत. या व्हिडिओत तनुजा अतिशय अशक्त आणि बारीक दिसत आहेत. तनुजा यांची तब्येत बघून सोशल मीडिया यूजर्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले, यांना कपड्यांनी नव्हे तर प्रोटीनची गरज आहे. आणखी एका यूजरने लिहिले, यांचे जेवणही कदाचित काजोलच खातेय.  


स्मोकिंग करतात तनुजा...
गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा आता 75 वर्षांच्या झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करताना त्या कॅमे-यात कैद झाल्या होत्या. मुलांसाठी आयोजित एका एनजीओच्या कार्यक्रमात त्या धुम्रपान करताना दिसल्याने त्यांच्यावर कडाडून टीका झाली होती. तनुजा यांनी अनेकदा स्मोकिंग सोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यात यश आले नाही, असे म्हटले जाते. 

 

बातम्या आणखी आहेत...